
दिवाळीच्या दिवसातील शेवटचा सण म्हणजे भाऊबीज. यंदा भाऊबीज आणि दिवाळी पाडवा हे दोन्ही सण 26 ऑक्टोबर दिवशी साजरा केला जाणार आहे. भाऊबीज दिवशी बहीण भावाचं औक्षणं करते. या औक्षणाच्या बदल्यात भाऊ-बहीण एकमेकांना भेटवस्तू देतात. अशा हा बहीण-भावाच्या जिव्हाळ्याचा सण साजरा करत दिवाळी सणाची सांगता केली जाते. मग तुमच्या बहीण-भावाला या सणाच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठमोळी ग्रीटिंग्स, शुभेच्छापत्रं, HD Images, Wishes, Quotes, WhatsApp Status पाठवून हा सण सेलिब्रेट करू शकता. नक्की वाचा: Bhau Beej Gifts 2022 : भाऊबीजेनिमित्त बहिणीला द्या खास भेटवस्तू , पाहा हटके भेटवस्तूंची यादी.
बहीण-भावाचं नातं हे अनेकदा तुझं-माझं जमेना आणि तुझ्यावाचून करमेना असं असतं. पण किमान सणाच्या दिवशी या गोड पण तितक्याच नटखट नात्याला अजून थोडं स्पेशल करण्यासाठी थोडे प्रयत्न करा. एकमेकांच्या गरजा, पसंती, नापसंती ओळखून त्यांना भेटवस्तू देऊन खूष करा.
भाऊबीजेच्या शुभेच्छा

बहिणीची असते भावावर अतूट माया,
मिळो त्याला नेहमी अशीच प्रेमाची छाया,
भावाची असते बहिणीला साथ,
मदतीला देतो नेहमीच हात
सण पवित्र नात्याचा
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!

रक्षणाचे वचन,
प्रेमाचे बंधन, घेऊन आला हा सण,
लाख लाख शुभेच्छा तुला
आज आहे भाऊबीजेचा पवित्र सण

जिव्हाळ्याचे बंध दिवसागणिक
उजळत राहू दे!
भावा-बहिणीची साथ
आयुष्यभर अतूट राहु दे…
भाऊबीजेच्या शुभेच्छा!

भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!

आली आज भाऊबीज
ओवाळते भाऊराया
राहू दे रे नात्यामध्ये
स्नेह, आपुलकी माया
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा..!

सण प्रेमाचा,
सण मायेचा,
सण भावाबहीणीच्या पवित्र नात्याचा
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा
भाऊबीजेचा सण हा यम द्वितिया म्हणून देखील ओळखला जाते. भावाला दीर्घायुष्य मिळावं या इच्छेसह बहिणी या दिवशी यम राजाची पूजा करतात. त्याच्या पाशातून आपला भाऊ सुरक्षित रहावा अशी त्यामागील कामना आहे. अगदीच भाऊ नसल्यास काही मुली चंद्राला आपला भाऊ मानून त्याला ओवाळून पूजा देखील करतात.