Happy Baisakhi 2020: वैसाखी किंवा बैसाखी (Baisakhi) हा पंजाब (Punjab) मध्ये साजरा होणारा एका महत्वाचा सण आहे. शेतात कापणीला सुरुवात होत असताना हा सण साजरा केला जाते. दरवर्षी साधारणपणे 13 किंवा 14 एप्रिलला हा सण असतो.या दिवशी शीख संप्रदायाचे नवीन वर्षही सुरु होते. 1699 मध्ये गुरु गोविंद सिंह (Guru Gobind Singh) यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या खालसा पंथाचा (Khalsa) हा स्थापना दिवस म्हणूनही ओळखला जातो. शीख धर्मात वसंत ऋतूतील रब्बी पिकांच्या कापणीच्या हंगामाचा दिवस म्हणूनही या दिवसाचे महत्त्व आहे. शीख धर्मीयांमध्ये बैसाखीला सौर कालगणनेनुसार नव्या वर्षाचा पहिला दिवस सुरु होतो. अशा या खास दिवसाच्या निमित्ताने आपल्या ओळखीतील शीख बंधुभगिनींना शुभेच्छा देण्यासाठी आम्ही काही खास शुभेच्छापत्रे तयार केली आहे. खास पंजाबी मधून असणारे हे Mesaages, Wishes, Greetings, Whatsapp Status ,Facebook, वर शेअर करून यंदा तुम्ही शीख बांधवांना नववर्षाच्या शुभेच्छा देऊ शकता.
बैसाखी च्या शुभेच्छा
दरम्यान, 1919 साली बैसाखीच्या दिवशीच जालियनवाला बाग हत्याकांड देखील घडले होते, यामध्ये जनरल डायर याच्या आदेशानुसार सभेसाठी जमलेल्या हजारो भारतीयांवर ब्रिटिश फौजेने गोळ्या झाडल्या होत्या, ज्यात अनेकांनी आपले प्राण गमावले होते.