
संपूर्ण जगात 1 एप्रिल रोजी ‘एप्रिल फूल डे’ (April Fool’s Day) साजरा केला जातो. या दिवशी लोक शाळा, कॉलेज, ऑफिस आणि घरात एकमेकांच्या खोड्या काढतात किंवा एकमेकांवर विनोद करतात. विशेष म्हणजे इतर दिवसांप्रमाणे या दिवशी केल्या जाणाऱ्या चेष्टेबाबत सर्वसामान्यपणे लोकांना राग येत नाही. अनेक गमतीजमती या दिवसात होत असतात, त्यामुळे या दिवसाला एक वेगळेच महत्त्व प्राप्त झाले आहे. 1 एप्रिल आणि चेष्टा करणे यांमधील पहिला संबंध चॉसरच्या कॅंटरबरी टेल्स (1392) मध्ये आढळतो.
दुसऱ्या एका कथेनुसार, असे म्हणतात की खऱ्या एप्रिल फुल दिवसाची सुरुवात फ्रान्समध्ये झाली. तेरावे पॉप ग्रेगरी यांनी 1582 रोजी युरोपमध्ये ज्युलियन कॅलेंडर ऐवजी ग्रेगरियन कॅलेंडर वापरण्यास सांगितले. त्या आगोदर ज्युलियन कॅलेंडर मध्ये 1 एप्रिलला नवीन वर्ष साजरे केले जात असत, परंतु नवीन ग्रेगरियन कॅलेंडर नुसार 1 एप्रिल ऐवजी 1 जानेवारीला नवीन वर्षे साजरे करण्यास पॉप ग्रेगरी यांनी सांगितले. त्यानंतरही फ्रान्समध्ये काही लोक जुन्या तारखेनुसार नवीन वर्ष साजरे करत होते आणि त्यांना ‘एप्रिल फूल’ म्हटले जात होते.
तर या दिवसाचे औचित्य साधून काही खास Messages, Images, Funny Jokes पाठवून तुम्ही तुमच्या मित्र-मंडळींची चेष्टा करू शकता किंवा एप्रिल फुलच्या शुभेच्छा देऊ शकता.





दरम्यान, काही अहवालांनुसार, ब्रिटिशांनी हा दिवस भारतात 19 व्या शतकात साजरा करण्यास सुरुवात केली. गेल्या काही वर्षांत तो साजरा करण्याची क्रेझ वाढली आहे. सोशल मीडियावर एप्रिल फुलशी संबंधित अनेक मीम्स आणि जोक्स दरवर्षी व्हायरल होतात. मात्र, कोणाशीही विनोद करताना तो विनोद जीवघेणा ठरणार नाही याची काळजी घ्या.