Hanuman Jayanti 2024: हनुमान जयंतनिमित्त पूजा कशी करावी? जाणून घ्या संपूर्ण  विधी
हनुमान जयंती शुभेच्छा | File Photo

 Hanuman Jayanti 2024: राम नवमी झाल्यानंतर सहा दिवसांनंतर हनुमान जंयती साजरी केली जाते. हिंदू कॅलेंडरनुसार, चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला हनुमान जयंती साजरी केली जाते. देशात मोठ्या उत्साहात हनुमान जयंती साजरी केली जाते. या दिवशी माता अंजनीच्या पोटातून हनुमानजीचा जन्म झाला. यंदा हनुमान जयंती कोणत्या दिवशी साजरा करणार असा संभ्रम आहे. हनुमान यांची योग्य पध्दतीने उपासना केल्यास भक्तांना सर्व संकटापासून दूर ठेवतो अशा विश्वास आहेत. असे म्हणाले जाते की, भक्तांनी जर योग्य पध्दतीने पूजा केल्यास नकारात्मक शक्ति दूर होतात. (हेही वाचा-  हनुमान जयंतीच्या शुभेच्छा WhatsApp Status, Facebook Messages द्वारा शेअर करत साजरा करा हनुमान जन्मोत्सव)

हनुमान जयंतीचा मुहुर्त

हिंदू शस्रानुसार, यंदा 23 एप्रिल रोजी  2024 हनुमान जयंती साजरी केली जाणार आहे. 23 तारखेच्या पहाटे पौर्णिमा सुरु होत आहे (वेळ - 3.25) आणि दुसऱ्या दिवशी 24 एप्रिलला पौर्णिमा समाप्त होत आहे. (वेळ 5.18) दिवसभर शुभ असल्याने तुम्ही पूजा करू शकता. मंगळवारी हा हनुमानचा दिवस असल्याने तो दिवस आणखी शुभ असल्याचे हिंदू शस्त्रात सांगितले आहे.

 जाणून घ्या पूजा विधी

 

हनुमान जयंतीच्या दिवशी ब्रह्ममुर्हतावर उठावे, स्नान करून पिवळे वस्त्र परिधान करावे. देवस्थान स्वच्छ करावे. त्यानंतर हनुमानाचे ध्यान करावे. मंदिरातील किंवा देवाऱ्यातील हनुमान फोटो आणि प्रतिमा असल्याचे ते स्वच्छ पूसून घ्यावेत. देवापूढे उदबत्ती पेटवल्यानंतर हनुमानाचा मंत्र जप करा आणि पूजा सुरु करावी. भक्तांनी व्रत आणि उपासनेची प्रतिज्ञा घ्यावी.

ओम केशवाय नमः, ओम नरणाय नमः, ओम माधवाय नमः, ओम हृषिकेशाय नमः यापैकी कोणताही एक मंत्र म्हणू शकता. हनुमानच्या फोटोसमोर लाल फुले, अक्षत,सुपारीचे पाने, सिंदूर,लाल चंदन, रोळी आणि तुळशीची डाळ अर्पण करा. हनुमानजींना बुंदीचा लाडू अर्पण करा. त्यानंतर हनुमान चालिसाचे पठन किंवा सुंदरकांड पाठ करा. त्यानंतर हनुमानजीच्या आरतीने पूजेची सांगता करा.