Hanuman Jayanti Wishes In Marathi | File Image

Hanuman Jayanti 2023 Wishes In Marathi: पवनपुत्र हनुमानाचा जन्मदिन हा हिंदू धर्मीय हनुमान जयंती (Hanuman Jayanti) म्हणून साजरा करतात. यंदा हा दिवस 6 एप्रिल दिवशी साजरा केला जाणार आहे. चैत्र नवमीला राम नवमी (Ram Navami) साजरी केल्यानंतर सर्वत्र पौर्णिमेच्या दिवशी हनुमान जन्मोत्सव साजरा करण्याची धामधूम सुरू होते. मग या मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा तुमच्या प्रियजणांना, नातेवाईकांना, आप्तेष्टांना पाठवून या दिवसाचा आनंद द्विगुणित करा. हनुमान जयंतीच्या शुभेच्छा मराठमोळ्या शुभेच्छा, WhatsApp Status, Greetings, HD Images शेअर करून मारूतीरायाचा जन्मोत्सव साजरा करा.

भगवान श्रीरामाचा भक्त हनुमानाचा जन्मोत्सव देशभर हनुमानाच्या मंदिरात साजरा केला जातो. या दिवसाच्या निमित्त काही ठिकाणी भंडारा असतो, काही ठिकाणी सुंठवडा बनवून त्याचं वाटप केलं जातं. रामायणामध्ये प्रभू रामचंद्रांसाठी हनुमानाने स्वामिनिष्ठेतून, राजनिष्ठेतून केलेल्या कार्याचे वर्णन पहायला, ऐकायला मिळते. आजही प्रभू रामचंद्रांच्या मंदिरामध्ये माता सीता, प्रभू रामचंद्र व लक्ष्मणासोबत हनुमानाची देखील मूर्ती हमखास पहायला मिळते. पिता केसरी आणि माता अंजनी यांच्या पोटी वायुदेवाची तपश्चर्या करून मारूतीचा जन्म झाल्याने पवनपुत्र असे देखील संबोधले जाते.  नक्की वाचा: Hanuman Jayanti 2023 Bhog Items: हनुमान जयंतीनिमित्त बनवा हे खास पदार्थ, पाहा व्हिडीओ .

हनुमान जयंतीच्या शुभेच्छा ( Hanuman Jayanti Wishes In Marathi)

Hanuman Jayanti Wishes In Marathi | File Image

अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान

एक मुखाने बोला,

बोला जय जय हनुमान

हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

Hanuman Jayanti Wishes In Marathi | File Image

विश्व रचनाऱ्याला म्हणतात भगवान

आणि दुःख हरण्याला म्हणतात हनुमान..!

हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.

Hanuman Jayanti Wishes In Marathi | File Image

रामाचा भक्त,

रुद्राचा अवतार आहे तू

अंजनीचा लाल आणि

दृष्टांचा काल आहेस तू

हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

Hanuman Jayanti Wishes In Marathi | File Image

रामाप्रती भक्ती, तुझी राखे अंतरी,

रामासाठी शक्ती,

तुझी राम राम बोले वैखरी…

हनुमान जयंती निमित्त शुभेच्छा

Happpy Hanuman Jayanti Wishes In Marathi | File Image

ज्याच्या मनात आहे श्रीराम,

ज्याच्या तनात आहे हनुमान,

संपूर्ण विश्वात जो आहे बलवान,

अशा मारूतीरायास आमचा शत शत प्रणाम..

हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

महाराष्ट्रात हनुमानाची भक्ती ही शरीर बलवान, पिळदार रहावे यासाठी देखील केली जाते. पूर्वीच्या काळात अनेक व्यायामशाळांच्या जवळ हनुमानाचं मंदिर किंवा लहान मूर्ती असते. समर्थ रामदास देखील हनुमानाचे उपासक होते ते तरूणांना मार्गदर्शन करताना हनुमानाचा आदर्श ठेवण्याचा सल्ला दिला जात असे.