Hanuman Jayanti HD Images: चैत्र पौर्णिमा म्हणजे राभक्त हनुमान जयंतीचा दिवस. यंदा चैत्र पौर्णिमा 16 एप्रिल रोजी आली आहे. हनुमान जयंती भक्त मोठ्या उत्साहात साजरी करतात. या दिवशी हनुमान मंदिरात मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. हनुमानाच्या मुर्तीला तेलाने अंघोळ घातली जाते. रुईची फुले आणि वडाच्या पानाचा हार अर्पण केला जातो. पाठिमागील दोन वर्षे ही कोरोना महामारीचा काळ होता. त्यामुळे या काळात नागरिकांना कोणत्याच प्रकारचे सार्वजनिक उत्सव साजरे करता आले नाहीत. यंदा मात्र सर्व प्रकारचे निर्बंध दूर झाल्याने हनुमान जयंतीचा उत्सव मोठ्या प्रमाणावर भक्तांना साजरा करता येणा आहे. दरम्यान, ज्या भक्तांना प्रत्यक्ष मंदिरात जाता येणार नाही त्यांना सोशल मीडियाच्या विविध माध्यमातून शुभेच्छा संदेश शेअर करुन बजरंगबलीचा जन्मोत्सव साजरा करता येणार आहे.
स्मार्टफोनमुळे जग हायटेक होण्याला चांगलीच मदत झाली आहे. खास करुन सोशल मीडिया वारणाऱ्यांच्या संख्येतही मोठीच वाढ झाली आहे. त्यामुळे आपणही हनुमान जयंतीच्या शुभेच्छा देण्यासाठी मराठी Greetings, HD Images, Wallpapers, Wishes आदिंचा वापर करु शकता. या इमेजेस सोशल मीडियाच्या फेसबुक (Facebook), ट्विटर (Twitter), व्हॉट्सअॅप (WhatsApp), टेलिग्राम (Telegram), इंस्टाग्राम (Instagram) वरुन शेअर करुन तुम्ही नातेवाईक, मित्रमंडळींना हनुमान जयंतीच्या शुभेच्छा देऊ शकता. (हेही वाचा, Hanuman Jayanti 2022 Greetings & Messages:हनुमान जयंतीच्या दिवशी कुटुंब आणि मित्रांना WhatsApp संदेश , शुभेच्छा, बजरंगबलीचे फोटो आणि HD वॉलपेपर पाठवून द्या शुभेच्छा)
हुनमान हे अंजनी सूत होते. त्यामळे त्यांना अंजनीपुत्र म्हणूनही ओळखले जाते. याशिवया त्यांना 'पवनपुत्र', 'बजरंगबली', 'मारुती' अशीही नावे आहेत. हनुमान हा प्रखर रामभक्त होता. त्याला शिव यांचा 11 अवतारही मानले जाते. व्यायाम करणारे अनेक तरुण हनुमानाची पूजा करतात. हनुमाननाप्रमाणे ताकद प्राप्त व्हावी, असा उद्देश त्यापाठीमागे असतो. काही अविवाहीत लोकही विवाह व्हावा म्हणून हनुमानाची पूजा करतात.