Haj | Representational Image (Photo Credits: Pixabay)

Online Registration For Haj: हज (Haj 2023) यात्रेसाठी जाऊ इच्छिणाऱ्या भारतीयांसाठी नोंदणी सुरु झाली आहे. त्यासाठी हज कमिटी ऑफ इंडियाने ऑनलाईन (Haj Committee of India) अर्ज मागवले आहेत. इच्छुक नागरिकांना नोंदीणीसाठी हे अर्ज (Haj Application Form 2023) दाखल करण्यास 10 फेब्रुवारी 2023 पासून सुरुवात झाली आहे. नोंदणी अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 10 मार्च 2023 आहे. प्राप्त माहितीनुसार, सन 2023 मध्ये हज यात्रेसाठी 2023 मध्ये 1.75 लाख नागरिकांना परवानगी देण्यासाठी भारत आणि सौदी अरेबिया यांच्यात करार करण्यात आलाआहे.

हज यात्रा करु इच्छिणाऱ्या भारतीयांना जर नोंदणी करायची असेल तर त्यासाठी त्यांना 10 फेब्रुवारी 2023 ते 10 मार्च 2023 या काळात कमिटी ऑफ इंडियाकडे अर्ज करावे लागतील. हे अर्ज आल्यानंतर त्याचा ड्रॉ काढला जाईल. त्यात ज्यांची नावे निगतील त्यांना हज यात्रेची संधी मिळणार आहे.

नोंदणी करण्यासाठी काय करावे लागेल

  • लॉटरी सोडतीमध्ये प्रवेश करण्यासाठी, तुम्हा सर्वांना hajcommittee.gov.in 2023 बुकिंग फॉर्म भरणे आवश्यक आहे. त्यासाठी कालपासून (10 फेब्रुवारी) सुरुवात झाली आहे. तत्पूर्वी त्यासाठी आवश्यक पात्रता, अटी तपासून पाहा.
  • hajcommittee.gov.in नोंदणी करण्यासाठी हज 2023 पात्रता तपासून घ्या.
  • नोंदणी करण्यापूर्वी नोंदणीची अंतीम तारीख जाणून घ्या. त्या तारखेपूर्वीच नोंदणी करा.
  • भारत 2023 मधील हज खर्चाशी संबंधित संपूर्ण माहिती हज करण्याच्या सूचनांसह येथे उपलब्ध आहे.

हज अर्ज 2023 साठी आवश्यक कागदपत्रे

  • अर्जदाराचा फोटो
  • मोबाईल नंबर
  • ई - मेल आयडी
  • नोंदणी शुल्क
  • अर्ज करतेवेळी अर्जदाराचे ओळखपत्रही सादर करावे. (आवश्यक)
  • पासबुकच्या पहिल्या आणि शेवटच्या पानाची फोटो कॉपी
  • बँक पासबुक किंवा कॅन्सल चेक.

हज ही मक्का, सौदी अरेबियाची वार्षिक इस्लामिक तीर्थयात्रा आहे. या यात्रेसाठी जगभरातील मुस्लिम नागरिक उपस्थिती दर्शवात. इस्लाममध्ये हीज ही एक पवित्र यात्रा मानली जाते. हज म्हणजे सौदी अरेबियातील मक्का या पवित्र शहरात, इस्लामिक भाषेतील “हाऊस ऑफ गॉड” किंवा काबाची तीर्थयात्रा मानली जाते.