Guru Purnima Marathi (Photo Credits-File Image)

Guru Shishya Pairs In Indian History: आषाढ महिन्यातील शुद्ध पौर्णिमेला गुरु पौर्णिमा(Guru Purnima 2020) म्हणून ओळखले जाते, पौर्णिमेच्या पूर्ण चंद्रातुन पसरणारा शीतल प्रकाश जसा असतो, तसाच गुरु हा आपल्या शिष्याला ज्ञानरुपी प्रकाश देत असतो, अशा या गुरूच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजेच गुरु पौर्णिमा. यंदा 5 जुलै रोजी गुरू पौर्णिमा साजरी केली जाणार आहे. भारतीय पुराणात, इतिहासात अशा अनेक गुरु शिष्यांच्या जोड्या आहेत ज्यांना आदर्श मानले जाते. असं म्हणतात की एक महान व्यक्ती तयार होण्यासाठी त्याच्या परिश्रमाला वळण देणाऱ्या, दिशा दाखवणाऱ्या गुरूचे सर्वाधिक महत्व असते. इतिहासात घडलेल्या अशाच महान व्यक्तींना घडवणाऱ्या गुरूंविषयी आजच्या या लेखात आपण जाणून घेणार आहोत. Happy Guru Purnima 2020 Messages: गुरु पौर्णिमा मराठी शुभेच्छा संंदेश, Wishes, WhatsApp Status च्या माध्यमातून शेअर करून माना गुरूंचे आभार!

चंद्रगुप्त- चाणक्य

चंद्रगुप्त मौर्य हे भारतात गाजलेल्या राजांपैकी एक नाव आहे, चंद्रगुप्ताच्या साम्राज्याचा विस्तार वाढवण्यासाठी त्याला ज्यांनी धडे दिले असे तल्लख बुद्दीचे चाणक्य हे आजही एक मानाने घेतले जाणारे नाव आहे.

शिवाजी महाराज-रामदास स्वामी

छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्रासोबतच जगभरात आदर्श म्हणून मानले जातात. त्यांच्या नीती मूल्यांचा, विचारांचा, आचरणाचा आजही दाखला दिला जातो. शिवाजी महाराजांना हे ज्ञान देणाऱ्या समर्थ रामदास स्वामींना एक महान गुरु म्हणून ओळखले जाते.

श्रीकृष्ण- सांदिपनी ऋषी

उज्जैन येथील सांदिपनी आश्रमात श्रीकृष्णाने 64 कला आत्मसात केल्या होत्या असे मानले जाते. Guru Purnima 2020 Wishes: गुरूपौर्णिमेच्या मराठी शुभेच्छा, Messages, Images, WhatsApp Status द्वारा शेअर करून साजरी करा व्यास पौर्णिमा

द्रोणाचार्य- अर्जुन

महाभारतात अर्जुनाला शौर्य, पराक्रम आणि लढण्याचे बळ देणाऱ्या श्रीकृष्णइतकेच अर्जुनाला धनुर्विद्या शिकवणाऱ्या द्रोणाचार्यांचे योगदान महत्वाचे आहे.

स्वामी विवेकानंद- रामकृष्ण

स्वामी विवेकानंद यांनी आयुष्यभर रामकृष्ण यांचे विचार पुढे नेण्याचे काम केले, त्यामुळे जे काम आज स्वामी विवेकानंद यांच्या नावे प्रसिद्ध आहे त्यात रामकृष्ण परमहंस यांना सर्वाधिक श्रेय आहे. एका गायनाच्या कार्यक्रमात झालेली ओळख आणि पुढे रामकृष्ण यांनी धर्मापासून ते कर्मा पर्यंत सर्व बाबीत त्यांना दिलेले ज्ञान या साऱ्याने स्वामी विवेकानंद यांना घडवले आहे.

या गुरु शिष्यांसोबतच सचिन तेंडुलकर- रमाकांत आचरेकर, नीम करोरी बाबा-मार्क झुकरबर्ग, पंडित बिरजू महाराज - माधुरी दीक्षित या जोड्या सुद्धा अलीकडच्या काळात बऱ्याच गाजल्या होत्या.

खरतर वय, अंतर, जात- पात असं कोणतंही बंधन न पाळता जो आपल्याकडील ज्ञान सदैव चांगल्या हेतूने इतरांना देत असतो तो प्रत्यके व्यक्ती हा गुरूच असतो. आपल्याही आयुष्यात अशी मंडळी असतील त्या सर्वांना गुरु पौर्णिमेच्या निमित्त आवर्जून धन्यवाद म्हणा.