Guru Purnima 2020 Wishes: गुरूपौर्णिमेच्या मराठी शुभेच्छा, Messages, Images, WhatsApp Status द्वारा शेअर करून साजरी करा व्यास पौर्णिमा
Guru Purnima 2020 | File Photo

Happy  Guru Purnima 2020 Marathi Wishes:  भारतामध्ये यंदा 5 जुलै, रविवार दिवशी गुरू पौर्णिमा (Guru Purnima) साजरी केली जाणार आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात विविध टप्प्यावर आई, वडील, शिक्षक अशा विविध रूपात गुरू समान व्यक्ती येतात. हिंदू धर्मियांच्या श्रद्धेनुसार, व्यास पौर्णिमा (Vyas Purnima) दिवशी गुरू पौर्णिमा साजरी करून त्यांच्याप्रति आदर, कृतज्ञता व्यक्त केली जाते. यंदा तुम्हांला घडवणार्‍या प्रत्येक गुरूची भेट घेनं शक्य नसेल पण सोशल मीडीयात व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp), फेसबूकच्या (Facebook) माध्यमातून मराठमोळे मेसेजेस (Messages), विशेस (Wishes), HD Images, वॉलपेपर्स, GIFs शेअर करून यंदाची गुरू पौर्णिमा डिजिटली साजरी करू शकता. भारतीय संस्कृतीमध्ये आई, वडील आणि गुरू ही दैवतं मानली जातात. त्यामुळे आपल्या संस्कृतीमधील हा गुरू-शिष्य परंपरेचा वसा पुढे कायम ठेवण्यासाठी आणि तुमच्यावर त्यांचे आशिर्वाद कायम स्वरूपी रहावेत यासाठी यंदा व्यास पौर्णिमा म्हणजेच गुरू पौर्णिमेला त्यांना नमन करण्यासाठी ही मराठमोळी शुभेच्छापत्र देऊन मानवंदना द्यायला विसरू नका.

महर्षी व्यास हे शंकराचार्यांच्या रूपात पुन्हा अवतीर्ण झाले अशी भाविकांची श्रद्धा आहे. संन्यासी व्यासपूजा म्हणून शंकराचार्यांची देखील पुजा करतात. गुरू परंपरेमध्ये महर्षी व्यास यांना सर्वश्रेष्ठ गुरूंचा दर्जा आहे. Guru Purnima 2020 Quotes: गुरुपौर्णिमेनिमित्त संत तुकाराम, कबीर ते साने गुरुजी यांचे अमुल्य विचार शेअर करुन गुरुप्रती व्यक्त करा कृतज्ञता!

 

व्यास पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

ज्यांनी मला घडवलं

या जगात लढायला,जगायला शिकवलं,

अशा प्रत्येकाचा मी ऋणी आहे!

गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

Guru Purnima 2020 | File Photo

गुरुर्ब्रम्हां गुरुर्विष्णु

गुरुदेवो महेश्वर:

गुरु साक्षात परब्रह्म

तस्मै श्री गुरवे नमः

गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

Guru Purnima Messages | File Photo

गुरुने दिला ज्ञानरुपी वसा

आम्ही चालवू हा पुढे वारसा

गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

Vyas Purnima Wishes | File Photo

गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा

Guru Purnima HD Images| File Photo

गुरू पौर्णिमा ही जशी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत, नृत्य परंपरेमध्ये सुरू आहे. तशीच ती अध्यात्मिक क्षेत्रामध्येही साजरी केली जाते. दरवर्षी गुरू पौर्णिमेनिमित्त साई भक्त, स्वामी समर्थ भक्त देखील गुरू पौर्णिमेचा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करून नामस्मरण करतात. यंदा तुमच्या आयुष्यातील गुरूचादेखील तुमच्यावर कायम आशिर्वाद रहावा हीच आमची सदिच्छा! व्यास पौर्णिमेनिमित्त गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!