Guru Purnima 2020 (PHoto Credits - File Image)

Guru Purnima Quotes in Marathi: आज गुरुपौर्णिमा. गुरु-शिष्य परंपरेची महती सांगणारा आजचा दिवस. आषाढ महिन्यातील शुद्ध पौर्णिमेला 'गुरुपौर्णिमा' साजरी केली जाते. भारतीय संस्कृतीत गुरुला देवासमान मानले जात असून प्रत्येकाच्या आयुष्यात गुरुचे अढळ स्थान असते. म्हणूनच या महत्त्वपूर्ण दिवशी गुरुंप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. गुरुपौर्णिमेला गुरुपूजन केले जाते. गुरुंना वंदन करुन आशीर्वाद घेतला जातो. भारतातील अनेक मंदिरांसह विद्यादालनात गुरुपौर्णिमेचा उत्सव अत्यंत उत्साहात साजरा केला जातो. व्यासांना भारतीय संस्कृतीमध्ये आद्यगुरु समजले जाते. आषाढ शुद्ध पौर्णिमेला व्यासांची जयंती असेत त्यामुळे या पौर्णिमेला 'व्यास पौर्णिमा' देखील म्हटले जाते.

भारतात पूराण काळापासून गुरु-शिष्य परंपरा आहे. ज्ञानसंपादनासाठी शिष्याला गुरुंच्या आश्रमात जावून राहावे लागत असे. ज्ञानप्राप्तीनंतर गुरुला गुरुदक्षिणा देण्यासाठी गुरुपौर्णिमा साजरी केली जात असे. कालांतराने गुरुकुल परंपरा लय पावली असली तरी गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची पद्धत कायम आहे. त्यामुळे आजही गुरु पौर्णिमेनिमित्त शिष्य आपल्या गुरुंची भेट घेतात. आयुष्यातील गुरुंचे महत्त्व लक्षात घेऊन संतासह सामान्यांनी अभंग, ओव्या, कविता, लेखन याद्वारे गुरुंबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत. संत तुकाराम, संत एकनाथ, संत कबीर, स्वामी विवेकानंद आणि साने गुरुजी यांचे विचार व्हॉट्सअ‍ॅप स्टेट्स (WhatsApp Status), फेसबूक मेसेंजर (Facebook Messenger) च्या माध्यमातून शेअर करुन आपल्या गुरुंचे आभार माना. (गुरुपौर्णिमेचा महत्त्व आणि उद्देश जाणून घ्या)

गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!

  • तुका म्हणे ऐसे गुरु

    चरण त्यांचे हृदयी धरू- तुकाराम महाराज

Guru Purnima 2020 | File Image

  • गुरू परमात्मा परेशु - संत एकनाथ

Guru Purnima 2020 | File Image

  • 'हरि रूठे गुरु ठौर है, गुरु रूठे नहिं ठौर॥'- संत कबीर

Guru Purnima 2020 | File Image

  • "आई माझा गुरु, आई कल्पतरू, सुखाचा सागरू, आई माझी प्रीतीचे माहेर, शांतीचे आगर, मांगल्याचे सार, आई माझी" - साने गुरुजी

Guru Purnima 2020 | File Image

  • Teacher alone teaches

    who has something to give

    for teaching is not imparting

    doctrines, it is

    Communicating- Swami Vivekananda

Guru Purnima 2020 | File Image

जन्मदात्या आईला आपल्या संस्कृती प्रथम गुरु मानले जाते. त्यानंतर वडील, शिक्षक यांच्या रुपात गुरुसमान व्यक्ती आपल्या जीवनात येतात. त्यानंतर जीवनाच्या वेगवेगळ्या टप्प्यात मार्ग दाखवणारे गुरु आपल्याला लाभत जातात. गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्याला ज्ञान देणाऱ्या प्रत्येक गुरुचे स्मरण करुया आणि त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करुया. यंदा कोरोना व्हायरस संकटामुळे गुरुंना भेटणे शक्य नसेल तर गुरुंबद्दलचे हे सुरेख विचार शेअर करुन तुमच्या भावना गुरुंपर्यंत पोहचवा.