Gudi Padwa Greetings (Photo Credits: File)

Gudi Padwa Marathi Messages: साडेतीन मुहूर्तांपैकी एक समजला जाणारा गुढीपाडवा हा सण चैत्र महिन्यातील शुक्ल प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा केला जाते. याच दिवशी श्रीरामाने वालीच्या त्रासातून दक्षिणेच्या प्रजेला मुक्त केले होते. या मुक्त झालेल्या प्रजेने उत्सव साजरा करत प्रत्येकाने आपल्या दारात उभारल्या होत्या. त्यामुळेच या दिवसाला गुढीपाडवा हे नाव मिळाले आहे असे पुराणातील कथा आहे. त्यामुळे प्रत्येक मराठी माणसासाठी हा सण खूप महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी एक उंच बांबूच्या काठीला धुवून स्वच्छ केले जाते. त्याला रेशमी साडी अथवा वस्त्र नेसवून त्यावर चांदीचा अथवा तांब्याचा तांब्या, कडूलिंब, आंब्याची पाने, साखरेची माळ, फुलांचा हार बांधून तिला सजवले जाते. घराच्या दारात अथवा खिडकीत ही गुढी उभारण्यात येते.

Gudi Padwa 2020 Greetings

Gudi Padwa Greetings 01 (Photo Credits: File)

Gudi Padwa Greetings 02 (Photo Credits: File)
Gudi Padwa Greetings 03 (Photo Credits: File)

हेदेखील वाचा- Gudi Padwa 2020 Rangoli Designs: गुढी पाडवा निमित्त सहज सोप्या रांगोळ्या दारात काढून करा चैत्र पाडव्याचं स्वागत!

Gudi Padwa Greetings 04 (Photo Credits: File)
Gudi Padwa Greetings 05 (Photo Credits: File)

या दिवशी महिला, मुली साडी नेसून, नथ, फेटा घालून छान साजश्रृंगार करतात. या दिवशी अनेक ठिकाणी शोभायात्रा देखील काढली जाते. या यात्रेत महिलांप्रमाणे पुरुष, मुलेही पारंपारिक पेहराव करुन शोभायात्रेत सहभागी होतात. यंदा कोरोना व्हायरसच्या धोक्यामुळे या शोभायात्रा देखील रद्द करण्यात आल्या असल्या तरीही आपण घर बसल्या या मराठमोळ्या ग्रीटिंग्स माध्यमातून आपल्या आप्तलगांना नववर्षाच्या शुभेच्छा नक्कीच देऊ शकतो नाही का!