
Ramdas Swami Jayanti 2025 HD Images: संतश्रेष्ठ श्री समर्थ रामदास स्वामी (Ramdas Swami) यांचे व्यक्तिमत्व भक्ती, ज्ञान आणि त्यागाने परिपूर्ण होते. समर्थ रामदासजींनी दासबोध, आत्माराम, मनोबोध इत्यादी पुस्तके लिहिली आहेत. त्यांनी रचलेल्या 90 हून अधिक आरत्या महाराष्ट्रातील प्रत्येक घरात गायल्या जातात. संत रामदास स्वामी यांनी शेकडो 'अभंग' देखील लिहिले आहेत. समर्थजी स्वतः अद्वैत वेदांती आणि भक्ती मार्गाचे संत होते, परंतु त्या काळातील समाजाची स्थिती पाहिल्यानंतर त्यांनी त्यांच्या पुस्तकांमध्ये राजकारण, सांसारिक व्यवहार, व्यवस्थापन विज्ञान इत्यादी अनेक विषयांवर मार्गदर्शन केले आहे.
आज 6 एप्रिल रोजी देशभरात रामदास स्वामी यांची जयंती (Ramdas Swami Jayanti 2025) होत आहे. रामदास स्वामी यांनी लोकांना केलेले मार्गदर्शन आजच्या तरुण पिढ्यांना देखील प्रेरणा देत आहे. रामदास स्वामी यांच्या जयंती निमित्त WhatsApp Status, Wishes, Wallpaper द्वारे तुम्ही आपल्या प्रियजनांना शुभेच्छा पाठवून हा दिवस आणखी खास करू शकता.
संतश्रेष्ठ श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या जयंतीनिमित्त त्रिवार अभिवादन!

संतश्रेष्ठ श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा!

तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला
संतश्रेष्ठ श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या जयंतीनिमित्त
मन:पूर्वक शुभेच्छा!

।।जय जय रघुवीर समर्थ।।
मनाचे श्लोक, दासबोध यातून प्रापंचिक ज्ञान
आणि परमार्थिक मार्गाची दिशा देणारे
श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या जयंतीनिमित्त विनम्र वंदन!

।।जय जय रघुवीर समर्थ।।
ज्ञानी, भक्तिमान आणि कर्मयोगी संतकवी
श्री समर्थ रामदास स्वामी
यांना जयंती निमित्त कोटी कोटी प्रणाम!

रामदास स्वामी यांनी साध्या, ओघवत्या शब्दांत देव-देवतांचे 100 हून अधिक स्तोत्रे लिहिली आहेत. आत्माराम, मानपंचक, पंचीकरण, चतुर्थमान, बागप्रकरण, स्फूर्त अभंग इत्यादी समर्थांच्या इतर निर्मिती आहेत. या सर्व रचना 'ओवी' नावाच्या मराठी भाषेतील पद्यात आहेत.