Happy Diwali Marathi Greetings: दिवाळी निमित्त Images, Wishes, SMS, WhatsApp Status च्या माध्यमातून द्या खास मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा!

Happy Diwali Marathi Greetings: दिवाळी हा सण दरवर्षी कार्तिक महिन्यातील अमावास्येला साजरा केला जातो. या सणाचा वेगळाच आनंद आणि उल्हास भारतभर पाहायला मिळतो. या दिवशी संपूर्ण देश दिव्यांनी उजळून निघतो. हिंदू धर्मात दिवाळी हा आनंद आणि समृद्धीचा सण मानला जातो. या दिवशी माता लक्ष्मी आपल्या भक्तांच्या घरी जाऊन त्यांना संपत्तीचा आशीर्वाद देते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. दिवाळीच्या दिवशी लंकापती रावणावर विजय मिळवून भगवान श्रीराम अयोध्येला परतले, असेही म्हटले जाते.

चौदा वर्षांचा वनवास संपवून प्रभू राम अयोध्येत परतल्याच्या आनंदात लोकांनी संपूर्ण अयोध्या दिव्यांनी सजवली. तेव्हापासून देशभरात दिवाळी साजरी केली जाते. या दिवशी लोक दिवे लावून आनंद साजरा करतात. दिवाळी निमित्त Images, Wishes, SMS, WhatsApp Status च्या माध्यमातून तुम्ही आपल्या मित्र-परिवारास खास मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा देऊ शकता. यासाठी तुम्ही खालील ईमेज मोफत डाऊनलोड करू शकता. (हेही वाचा - Dhantrayodashi 2022 Messages: धनत्रयोदशीनिमित्त Images, Wishes, SMS, WhatsApp Status च्या माध्यमातून आपल्या मित्र-परिवारास द्या खास शुभेच्छा!)

दिन दिन दिवाळी

गाई म्हशी ओवाळी

ईडा पीडा जाऊ दे

बळीचं राज येऊ दे

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

Happy Diwali Marathi Greetings

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

Happy Diwali 2022

शुभ दीपावली

Happy Diwali Marathi Greetings

दीपावली च्या हार्दिक शुभेच्छा

Happy Diwali Marathi Greetings

चांदण्यांचा सडा अंगणभर पसरलेला

दारातला दिवा आकाशात खुललेला

अभ्यंगस्नानाने करूया सुरूवात

लक्ष्मीची पाऊलं दिवाळी सण  घेऊन येऊन दारात

दिवाळीच्या शुभेच्छा

Happy Diwali Marathi Greetings

यावर्षी कार्तिक महिन्यातील अमावस्या 24 आणि 25 ऑक्टोबर या दोन्ही दिवशी येत आहे. पण 25 ऑक्टोबरला प्रदोषकाळाच्या आधी अमावस्या तिथी संपत आहे. दुसरीकडे, 24 ऑक्टोबर रोजी प्रदोष काळातील अमावस्या तिथी असेल. 24 ऑक्टोबर रोजी निर्दिष्ट कालावधीतही अमावस्या तिथी असेल. त्यामुळे यंदा 24 ऑक्टोबर रोजी देशभरात दिवाळीचा सण साजरा होणार आहे.