Gauri Avahan 2022: आज जेष्ठागौरी आवाहन, जाणून घ्या पुजा विधी, मुहूर्त आणि आजच्या दिवसाचं विशेष महत्व

आज जेष्ठागौरी आवाहन (Jeshtha Gauri Avahan 2022) गौरायांचा माहेरी येण्याचा दिवस. तसं तर आज संपूर्ण आणि पुढील दोन दिवस गौराय वर्षा आहेत. त्यामुळे आज दिवसभरात कुठल्याही वेळात गौरायांची  प्रतिष्ठापणा (Gauri Sthapana) करता येईल. तरी आजच्या दिवसात अनुराधा नक्षत्रवर  मुहूर्त साधत गौरायांची प्रतिष्ठापणा केल्यास अधिक मंगलदायक ठरेल. तरी या कालावधी दरम्यान तुम्ही तुमच्या घरी कुठल्याही वेळात  स्थापना करु शकतात. गौरींचे माहेरवाशीणीसारखे स्वागत केले जाते. भाद्रपद महिन्याच्या शुद्ध पक्षात अनुराधा नक्षत्रावर म्हणजे आज गौरींचे घरोघरी आगमन होते.  ज्यांना आपल्या घरी गौरी आवाहन करायचे आहे त्यांनी आज दिवसभरात केव्हाही गौरींची प्रतिष्ठापना करु शकतात. गौरीपूजनला काही ठिकाणी महालक्ष्मीपूजन (mahalakshmi Poojan) असेही म्हणतात. तर गौरींचे हे पूजन ज्येष्ठ नक्षत्रावर केले जाते म्हणून यांना ज्येष्ठागौरी आवाहन असे म्हणतात.

 

गौरी (Gauri) आणि गणपती (Ganpati) जेव्हा एकाच वेळी घरात असतात तेंव्हा तो उत्साह वेगळाच असतो. गौरीच्या आगमनाचे, पूजेचे, विसर्जनाचे असे तीनही दिवस धर्मशास्त्राने निश्चित करुन दिलेले असल्यामुळे गौरी मात्र ठरलेल्या दिवशी येतात आणि ठरलेल्याच दिवशी जातात. आज येतात, उद्याचा दिवस राहतात आणि तिसऱ्या दिवशी विसर्जनासाठी निघतात. त्यामुळे तीन दिवसाच्या माहेरा आलेल्या या गौरायांचं माहेरपण अगदी थाटामाटात केलं जातं. (हे ही वाचा:- Gauri Avahan Wishes in Marathi: गौरी आवाहनाच्या शुभेच्छा WhatsApp Status, Facebook Messages द्वारा शेअर करून स्वागत करा गौराईचं!)

 

माहेरवाशीण म्हणून येणाऱ्या गौरायांचं आवाहन दारात रांगोळी काढून, लक्ष्मीची पावले काढून, ताट आणि चमचा वाजवत गौरीचे मुखवटे घरात आणले जातात. त्यांना छान दागिने, फुलांचे हार, नव्या साड्या नेसून गौरीला सजवले जाते. तिला गोडाधोडाचे जेवण केले जाते. यामध्ये 16 भाज्या, पंचपक्वान्न असा बेत केला जातो. राज्यातील विविध भागात विदर्भ (Vidarbha), मराठवाडा (Marathwada), पश्चिम महाराष्ट्रात (Western Maharashtra) मोठ्या प्रमाणत गौरी आवाहनाचा सोहळा थाटामाटात पार पडतो.