
महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सवाच्या काळात गणपतींच्या पाठोपाठ गौराईचं आगमन होतं. यंदा गौराई 3 सप्टेंबर दिवशी येणार आहेत. काही घरात ज्येष्ठा आणि कनिष्ठा अशा दोन गौराई येतात. एक दिवसाचा पाहुणचार स्वीकारून गौराईचं गणपतीसोबत विसर्जन देखील करण्याची प्रथा आहे. मग या मंगल पर्वाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी मराठमोळी शुभेच्छापत्रं, Wishes, Greetings, HD Images, Photos शेअर करून गौरी आवाहन दिवसाच्या शुभेच्छा तुमच्या प्रियजणांसोबत नक्की शेअर करा.
महाराष्ट्रात गौराईचं आगमन अनुराधा नक्षत्रामध्ये होते. त्यामुळे 3 सप्टेंबरच्या संध्याकाळी गौराई घराघरामध्ये आणल्या जातील. रात्री त्यांचा साजशृंगार केला जातो. दरम्यान गौरी आणण्याच्या देखील प्रत्येक घरानुसार वेगवेगळ्या रीती भाती असतात. पण माहेरवाशिणींचा सण म्हणून ओळख असलेल्या या सणाच्या शुभेच्छा तुमच्या मैत्रिणींना नक्की द्या. नक्की वाचा: Gauri-Ganpati 2022 Pujan Timings: यंदा 31 ऑगस्टला गणेश पूजनाची आणि 4 सप्टेंबरला गौरी पूजनाची शुभ मुहूर्त वेळ काय?
गौरी आवाहनाच्या शुभेच्छा

ज्येष्ठा गौरी आवाहन आणि पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा
गौरी आवाहन । File Imagesआली माझ्या गं अंगणी गौराई,
लाभो तुम्हास सुख समृद्धी,
गौरी आवाहनाच्या मनापासून शुभेच्छा!

ज्येष्ठा गौरी आवाहनाच्या दिनी
गौराई तुमच्या घरात सुख, समृद्धी,
आनंद आणि भरभराट घेऊन येऊ दे
ही सदिच्छा!
गौरी आवाहनाच्या शुभेच्छा!

गौरी गणपतीच्या आगमना,
सजली अवधी धरती,
सोनपावलाच्या रुपाने
ती येवो आपल्या घरी,
होवो आपली प्रगती,
लाभो आपणास सुख समृद्धी

ज्येष्ठा गौरी आवाहनाच्या हार्दिक शुभेच्छा!
गौरी म्हणजे पार्वती. शिव शंकराची पत्नी माहेरपणाला येते आणि आशिर्वाद देऊन जाते अशी या सणामागील धारणा आहे. गौरी आवाहनानंतर दुसरा दिवस गौरी पूजनाचा असतो. त्यादिवशी रात्रभर सार्या माहेरवाशिणी खेळ खेळून सण साजरा करतात.