
Gatari Amavasya 2019: अस्सल नॉन-व्हेजिटेरियन लोकांसाठी आता काही दिवस उरले असून लवकरच आपल्या आयुष्यात श्रावण महिना धडकणार आहे. त्यामुळे ज्यांनी रविवारी गटारी साजरी केली किंवा ज्यांची राहिली त्यांच्यासाठी अजून बुधवार म्हणजेच 31 ऑगस्ट बाकी आहे. रविवारी बहुतेकांकडे चिकन, मटणाचाचा बेत पाहायला मिळाला. त्यामुले ज्यांची अजून मासे खाण्याची इच्छा बाकी असेल त्यांच्यासाठी बुधवार हा दिवस शिल्लक आहे असे म्हणायला हरकत नाही. आषाढी अमावस्या 31 जुलै दिवशी दुपारी 12 वाजल्यापासून 1 ऑगस्टच्या सकाळी 8.42 मिनिटांपर्यंत आहे. यंदा श्रावण महिना 30 ऑगस्टला संपणार आहे. त्यानंतर लगेच गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे. त्यामुळे अनेक घरात सुमारे दीड दोन महिन्यांनंतर मांसाहाराचा बेत रंगेल.
त्यामुळे त्याआधी माशांवर मनसोक्त ताव मारायचा असेल, तर आज आम्ही ज्या 5 भन्नाट रेसिपी सांगणार आहोत, त्या नक्की ट्राय करुन पाहा. ज्यांची चव पुढील दीड-दोन महिने तरी तुमच्या जिभेवर रेंगाळेल
1. भरलेले पापलेट:
2. खेकड्याचे कालवण:
3. कोळंबी तवा फ्राय:
4. फिश कटलेट:
5. ओल्या जवल्याची भजी:
श्रावण महिना हा माशांच्या प्रजननाचा काळ असल्यामुळे तुम्ही जरी श्रावण पाळत नसाल, तरी मासे खाणे आपण सहसा टाळतो. म्हणूनच मांसाहार करणा-या अस्सल नॉन व्हेजिटेरियन खवय्येंनी येत्या बुधवारी यापैकी कोणत्याही रेसिपीजचा बेत आखून तुमच्या गटारीचा अंतिम टप्पा अगदी पुर्णत्वास न्या. म्हणजे आपल्याला यंदाची गटारी नीट साजरी करता आली नाही म्हणून तुमच्या मनात रुख-रुख राहणार नाही.