Gatari | File Image

श्रावण (Shravan) महिना हा हिंदू धर्मीयांसाठी पवित्र महिन्यांपैकी एक आहे. यंदा महाराष्ट्रामध्ये श्रावण महिना 18 जुलै पासून सुरू होत आहे. यावर्षीचा श्रावण महिना 59 दिवसांचा आहे. 2 महिने श्रावण महिना पाळला जाणार आहे. श्रावण महिना हा व्रत वैकल्यांचा असल्याने या काळात अनेक घरात कटाक्षाने मांसाहार टाळला जातो. मग अशांसाठी 'गटारी' हा दिवस म्हणजे मांसाहार करण्यासाठीचा शेवटचा दिवस आहे. यावर्षी 2 महिन्याचा श्रावण असल्याने मांसहारींना पुन्हा मांसाहार करण्यासाठी मोठी प्रतिक्षा करावी लागणार आहे.

गटारी हा काही सण किंवा त्याच्याशी धार्मिक मान्यता जोडलेल्या नाहीत पण सोशल मीडीयातील गजबजाटामुळे या दिवसानिमित्त हमखास मीम्स, जोक्स शेअर केले जातात त्यामुळे आता या दिवसाची उत्सुकता आणि चर्चा अधिक झाली आहे.

यंदा गटारी कधी?

गटारी ची सुरूवात कधी, कशी, कुठून झाली याची कोणतीही ठोस माहिती नाही. परंतू महाराष्ट्रामध्ये अमावस्येनंतर नवा महिना सुरू होत असल्याने श्रावण शुद्ध प्रतिपदेच्या आदला दिवस हा मांसाहाराची शेवटची संधी म्हणून गटारी साजरी केली जाते. ज्या घरात विशिष्ट वाराला मांसाहाराची रीत आहे तेथे 16 जुलै हा मांसाहारावर ताव मारण्याचा शेवटचा रविवार आहे. 17 जुलै हा दिवस अमावस्येचा आहे. या दिवशी दीप अमावस्या साजरी केली जाते. घरातील दिवे पुसून ते पेटवले जातील.

गटारीला चिकन वडे, माशाच्या विविध पदार्थांवर मांसाहारी मनसोक्त ताव मारतात. यासोबतच पार्ट्यांमध्ये अनेकजण मद्यसेवनाचा देखील आनंद लूटतात. कारण श्रावण महिना हा पवित्र असल्याने त्यामध्ये मांसाहार, मद्य सेवन टाळलं जातं. त्यामुळे या गोष्टी पुढे महिनाभर निषिद्ध मानल्या जाणार असल्याने त्याचा आनंद लुटला जातो. Gatari Special Recipes: 'गटारी स्पेशल' बेत मध्ये 'चिकन' वर ताव मारायचाय? मग आज ट्राय करा या '5' चमचमीत चिकन रेसिपीज! 

श्रावण महिना हा धार्मिकदृष्ट्या पवित्र असला तरीही पवासाळ्याच्या दिवसांत येत असल्याने इतर महिन्याच्या तुलनेत या काळात मासेमारी मंदावते. माशांचा देखील हा प्रजनानाचा काळ असल्याने मांसाहार कमी करण्याची ही सोय आहे.

टीप - सदर लेख केवळ माहिती देण्याच्या उद्देशाने लिहण्यात आला असून यामधील कोणत्याही गोष्टीची लेटेस्टली मराठी पुष्टी करत नाही.