GSB Seva Mandal Ganpati (Photo Credits-Facebook)

गणपती उत्सवासाठी प्रवास करणाऱ्या गणेशभक्तांना दिलासा देणारी बातमी आहे. गणेशोत्सव काळात राज्यभरात प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनानं गणपती विशेष रेल्वे गाड्या धावणार आहेत. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आज त्यांच्या अधिकृत ट्विटर अकांउटहून ट्वीट करत ही माहिती दिली आहे.

गणेशोत्सव हा राज्यातील सर्वात मोठा सणांपैकी एक आहे. त्या निमित्तानं दरवर्षी गणेशोत्सव काळात मुंबई, पुण्यातून गणपती विशेष रेल्वे गाड्या सोडल्या जातात. तसंच, गाड्यांच्या फेऱ्याही वाढवल्या जातात. यंदाही तशी सोय करण्यात आली आहे. मात्र, वाढती गर्दी लक्षात घेऊन यंदा मध्य रेल्वेकडून गणेशभक्तांसाठी तब्बल 74 विशेष रेल्वे गाड्या धावणार आहेत. मुंबई-सावंतवाडी 44  गाड्या, नागपूर-मडगाव द्वि-साप्ताहिक12 गाड्या, पुणे-कुडाळ 6 गाड्या, पुणे-थिवि/कुडाळ -पुणे 6 गाड्या आणि पनवेल-कुडाळ/थिवि-पनवेल 6 गाड्या विशेष, अशा एकूण 74 विशेष रेल्वे गाड्या धावणार असल्याची माहिती केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी दिली आहे. ( हे ही वाचा : - Pandharpur Ashadhi Ekadashi 2022 Special Trains: आषाढी एकादशी यात्रेसाठी लातूर, नागपूर सह या स्टेशन वरून पंढरपूर साठी मध्य रेल्वे चालवणार विशेष ट्रेन्स)

तसेच या सर्व विशेष रेल्वे गाड्यांचं बुकिंग लवकरच सुरु होणार असुन रेल्वेच्या सर्व पीआरसी केंद्र आणि रेल्वेच्या अधिकृत संकेत स्थळावर म्हणजेच https://www.irctc.co.in/ येथे भेट देऊन तिकीट आरक्षित करता येणार आहे.