गणेशोत्सव (Ganeshotsav 2022) साक्षात भगवान गणेशाच्या जन्मदिवसाच्या रुपात साजरा केला जातो. गणेश चतुर्थीच्या दिवशी, भगवान गणेशाला बुद्धी, समृद्धी आणि सौभाग्याची देवता मानले जाते. पुरानकथेनुसार गणपतीचा जन्म शुक्ल पक्षादरम्यान झाला. गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi 2022) निमित्त भक्तांमध्ये प्रचंड उत्साह पाहायाल मिळतो. मोठ्या उत्साहात गणपती बाप्पाची पूजा केली जाते. अशा या खास दिवशी म्हणजेच गणेश चतुर्थी निमित्त आपणही आपल्या आप्तेष्टांना WhatsApp, Facebook आणि सोशल मीडियाच्या इतरही प्लॅटफॉर्मवरुन Messages पाठवून गणेश उत्सवाच्या शुभेच्छा देऊ शकता.

दरवर्षी, गणेश चतुर्थी शुक्ल पक्षाच्या चतुर्थी दिवशी (चंद्र महिन्याचा अर्धा भाग) साजरी केली जाते. यंदा गणेश चतुर्थी आजपासून ( बुधवार,31 ऑगस्ट 2022 ) साजरी केली जाणार आहे. लोक गणपतीच्या मातीच्या मूर्ती घरी या दिवशी आणतात आणि त्यांची पूजा करतात. आजपासून सुरु होत असलेल्या गणपती उत्सवाची 9 सप्टेंबर रोजी गणेश विसर्जनाने सांगता होईल. गणपती हा अडथळे दूर करणारा आणि समृद्धी, संपत्ती आणि यश आणि आनंद देणारा मानला जातो. त्यामुळे गणेश चतुर्थीदिवशी गणपतीचे आगमन लोकांच्या घरांमध्ये आनंदाला उधान आणतो. हा सण आणखी अविस्मरणीय बनवण्यासाठी गणेश चतुर्थीच्या दिवशी तुमच्या जवळच्या आणि प्रियजनांना काही अर्थपूर्ण आणि प्रेरणादायी कोट्स, संदेशांसह शुभेच्छा देऊ शकता. (हेही वाचा, Ganesh Chaturthi Pranpatishtha Puja: गणेश चतुर्थीला गुरूजींशिवाय गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा कशी कराल? जाणून घ्या पूजा विधी)

!! गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया !!

गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा

तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला

गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

बाप्पांची स्वारी म्हणजे आनंद घरोघरी

गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा

गणपतीची नावेही खास असतात. सांगितले जाते की गणपतीची तब्बल 108 नावे आहेत. ती पुढील प्रमाणे: अखूरथ,अनंतचिदरुपम,अमित,अलंपत,अवनीश,अविघ्न, ईशानपुत्र, उद्दण्ड, उमापुत्र, एकदंत, एकदंष्ट्र, एकाक्षर,कपिल, कवीश, कीर्ति, कृपाकर, कृष्णपिंगाक्ष, क्षिप्रा,क्षेमंकरी, गजकर्ण, गजनान, गजवक्त्र, गजवक्र,गजानन, गणपति, गणाध्यक्ष, गणाध्यक्षिण, गदाधर, गुणिन,गौरीसुत, चतुर्भुज, तरुण, दूर्जा, देवदेव. देवव्रत,देवांतकनाशकारी, देवेन्द्राशिक, द्वैमातुर, धार्मिक, धूम्रवर्ण,नंदन, नमस्तेतु, नादप्रतिष्ठित, निदीश्वरम, पाषिण, पीतांबर,पुरुष, प्रथमेश्वर, प्रमोद, बालगणपति, बुद्धिनाथ, बुद्धिप्रिय,बुद्धिविधाता, भालचन्द्र, भीम, भुवनपति, भूपति, मंगलमूर्ति,मनोमय, महागणपति, महाबल, महेश्वर, मुक्तिदायी, मूढ़ाकरम,मूषकवाहन, मृत्युंजय, यज्ञकाय, यशस्कर. यशस्विन, योगाधिप,रक्त, रुद्रप्रिय, लंबकर्ण, लंबोदर, वक्रतुंड, वरगणपति,वरदविनायक, वरप्रद, विकट, विघ्नराज, विघ्नराजेन्द्र, विघ्नविनाशन,विघ्नविनाशाय, विघ्नहर, विघ्नहर्ता, विघ्नेश्वर, विद्यावारिधि, विनायक,विश्वमुख. वीरगणपति,शशिवर्णम,शांभवी,शुभगुणकानन, शुभम,शूपकर्ण, श्वेता, सर्वदेवात्मन, सर्वसिद्धांत, सर्वात्मन, सिद्धिदाता.

गणपती येती घरी, बरसती आनंदाच्या सरी

गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

गणेशोत्सवाची गणेश भक्त वर्षभर वाट पाहात असतात. त्यासाठी काही महिने आगोदरपासूनच तयारी सुरु असते. यंदाच्या वर्षी आज म्हणजेच 31 ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थी आहे. शाळा आणि सरकारी कार्यालयांना सुट्ट्या आहेत. खासगी अस्तापणांनीही सुट्ट्या दिल्या आहेत. काही अस्तापना अर्धी सुट्टी देता. त्यामुळे गणेशभक्तांना अधिकचा वेळ मिळतो. परिणामी जल्लोषात चांगलीच वाढ होते.