Ganesh Chaturthi 2019 Special Trains: गणेश चतुर्थी निमित्त कोकणवासियांसाठी ‘पश्चिम रेल्वे’च्या स्पेशल ट्रेन्स; पहा वेळापत्रक
Representational Image (Photo Credits: PTI)

Ganeshotsav Special Western Railway Trains For Konkan: गणेश चतुर्थी हा महाराष्ट्रातील मोठा सण. मात्र कोकणात याची विशेष धूम असते. गणेश चतुर्थी निमित्त कोकणवासिय मोठ्या संख्येने कोकणात जातात. त्यामुळे प्रवाशांसाठी दरवर्षी रेल्वेकडून विशेष ट्रेन्सचे आयोजन केले जाते. यंदा देखील पश्चिम रेल्वेने गणेशोत्सव विशेष ट्रेन्सची (Ganeshotsav Special Train) सोय केली आहे. या विशेष ट्रेन्समध्ये चार ट्रेन्सचा समावेश असून या ट्रेन्सचे संपूर्ण वेळापत्रक देण्यात आले आहे.

पश्चिम रेल्वेकडून सोडण्यात येणाऱ्या विशेष ट्रेन्स:

1) ट्रेन नं. 09007/09008 मुंबई सेंट्रल थिवीम मुंबई सेंट्रल (द्वि साप्ताहिक)

# ट्रेन नं. 09007 मुंबई सेंट्रल थिवीम मुंबई सेंट्रल (द्वि साप्ताहिक) ही ट्रेन मुंबई सेंट्रल हून 29 ऑगस्ट, 2 सप्टेंबर, 5 सप्टेंबर आणि 12 सप्टेंबर रात्री 11.55 रोजी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 4 वाजता थिवीमला पोहचेल.

# ट्रेन नं. 09008 मुंबई सेंट्रल थिवीम मुंबई सेंट्रल (द्वि साप्ताहिक) ही ट्रेन 30 ऑगस्ट, 3 सप्टेंबर, 6 सप्टेंबर आणि 13 सप्टेंबर रोजी थिवीमवरुन संध्याकाळी 4.30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी मुंबई सेंट्रलला सकाळी 9.30 पोहचेल.

यो ट्रेन्स बोरिवली, वसई रोड, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि मडूरे या स्टेशन्सवर थांबतील.

2) ट्रेन नं. 09416/09415 अहमदाबाद सावंतवाडी रोड अहमदाबाद (साप्ताहिक)

# ट्रेन नं. 09416 अहमदाबाद सावंतवाडी रोड अहमदाबाद (साप्ताहिक) ही ट्रेन अहमदाबाद हून 27 ऑगस्ट आणि 10 सप्टेंबर रोजी सकाळी 9.40 वाजता सुटेल आणि सावंतवाडीला दुसऱ्या दिवशी पहाटे 5.30 वाजता पोहचेल.

# ट्रेन नं. 09415 सावंतवाडी रोड अहमदाबाद (साप्ताहिक) ही ट्रेन 28 ऑगस्ट आणि 11 सप्टेंबर रोजी ही ट्रेन सावंतवाडी रोडवरुन सकाळी 6.10 वाजता सुटेल आणि अहमदाबादला दुसऱ्या दिवशी रात्री 1 वाजता पोहचेल.

ही ट्रेन वडोदरा, सूरत, वापी, वसई रोड, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली आणि कुडाळ या स्टेशन्सवर थांबेल.

3) ट्रेन नं. व्ही 04 9 418/0 9 417 अहमदाबाद थिवीम अहमदाबाद (साप्ताहिक)

# ट्रेन नं. 09418 अहमदाबाद थिवीम अहमदाबाद (साप्ताहिक) ही ट्रेन 30 ऑगस्ट, 6 सप्टेंबर आणि 13 सप्टेंबर रोजी अहमदाबादहून संध्याकाळी 4.15 वाजता सुटेल आणि थिवीमला दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 4 वाजता पोहचेल.

# ट्रेन नं. 09417 थिवीम अहमदाबाद (साप्ताहिक) ही ट्रेन 31 ऑगस्ट, 7 सप्टेंबर आणि 17 सप्टेंबर रोजी थिवीमहून संध्याकाळी 4.30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी अहमदाबाद येथे संध्याकाळी 4 वाजता पोहचेल.

ही ट्रेन वडोदरा, सूरत, वापी, वसई रोड, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, कुडल, सावंतवाडी रोड आणि मडूरे या स्थानकांवर थांबेल.

4) ट्रेन नं. 09106/09105 वडोदरा सावंतवाडी रोड-वडोदरा (साप्ताहिक)

# ट्रेन नं. 09106 वडोदरा सावंतवाडी रोड-वडोदरा (साप्ताहिक) ही ट्रेन वडोदरा जंक्शनवरुन 1 सप्टेंबर आणि 8 सप्टेंबर रोजी दुपारी 3.20 वाजता सुटेल आणि सावंतवाडीला दुसऱ्या दिवशी सकाळी 9.30 वाजता पोहचेल.

# ट्रेन नं. 09105 सावंतवाडी रोड-वडोदरा (साप्ताहिक) ही ट्रेन सावंतवाडी रोड वरुन 2 सप्टेंबर आणि 9 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता सुटेल आणि वडोदरा येथे दुसऱ्या दिवशी सकाळी 5.30 वाजता पोहचेल.

ही ट्रेन भरूच, सूरत, नवसारी, वलसाड, वापी, दहानू रोड, बोईसर, वसई रोड, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, कणकवली, कुडाळ आणि झाराप या स्टेशन्सवर थांबेल.