Engineer’s Day 2022 in India Date & Significance: इंजीनियर्स डेची तारीख आणि महत्व, जाणून घ्या
Happy-Engineers-Day-2022

Engineer’s Day 2022 in India Date & Significance:  इंजीनियर्सचा प्रत्येक क्षेत्रात मोलाचा वाटा आहे. त्यामुळे प्रत्येक इंजीनियर च्या सन्मानार्थ इंजीनियर्स डे साजरे करणे गरजेचे आहे. अशा काळात जिथे लोक इंजीनियर्सवर विनोद आणि मीम्स बनविण्यावर जास्त लक्ष केंद्रित करतात परंतु प्रत्यक्षात त्यांची भूमिका ओळखणे  अत्यंत महत्त्वाचे आहे. 15 सप्टेंबर रोजी साजरा केला जाणारा अभियंता दिवसाचा मूळ उद्देश हाच आहे. इंजीनियर्स डे विश्वेश्वरय जयंती म्हणूनही ओळखला जातो, भारताचे पहिले सिव्हिल इंजिनियर सर भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंती निमित हा दिवस साजरा केला जातो. चला तर अभियंता दिनाचे महत्त्व आणि मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त का साजरा केला जातो इंजीनियर्स डे, जाणून घेऊया 

अभियंता दिवस २०२२ कधी आहे?

1968 मध्ये भारतरत्न डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जन्मतारखेला भारत सरकारने 'अभियंता दिन' म्हणून घोषित केले. तेव्हापासून दरवर्षी 15 सप्टेंबर रोजी अभियंता दिन साजरा केला जातो. विश्वेश्वरय्या यांचा जन्म 15 सप्टेंबर 1860 रोजी म्हैसूर (कर्नाटक) च्या कोलार जिल्ह्यात झाला. सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या,यांना त्यांच्या अनेकदा आद्याक्षरांनी म्हणजे  MV ने ओळखले जाते.  MV, हे पहिले भारतीय नागरी अभियंता होते. अभियंता म्हणून डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांनी देशात अनेक धरणे बांधली आहेत, ज्यात म्हैसूरमधील कृष्णराज सागर धरण, पुण्यात खडकवासला धरण आणि ग्वाल्हेरमधील तिग्रा धरण यांचा समावेश आहे. एवढेच नाही तर हैदराबाद शहर बनवण्याचे संपूर्ण श्रेय डॉ विश्वेश्वरय्या यांना दिले जाते. त्यांनी हैदराबाद येथे पूर संरक्षण प्रणालीची रचना केली, त्यानंतर ते संपूर्ण भारतात प्रसिद्ध झाले. विश्वेश्वरय्या यांना आधुनिक म्हैसूर राज्याचे जनक असेही म्हटले गेले आहे . भारतातील महान अभियंत्यांपैकी एक होते. त्यांनी आधुनिक भारताची निर्मिती केली आणि देशाला नवे रूप दिले. त्यांनी अभियांत्रिकी क्षेत्रात असाधारण योगदान दिले असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. त्यामुळे त्यांच्या वाढदिवसानिमित 'अभियंता दिन' साजरा करण्याचे घोषित करण्यात आले होते. 

अभियंता दिनाचे महत्त्व 

अभियांत्रिकीकडे फक्त करिअर म्हणून पाहिले जात असले तरी, अभियंत्याचे काम हे देशाच्या सुरळीत कारभारात एक महत्त्वपूर्ण योगदान देणारे आहे. आपण वापरत असलेल्या रस्त्यांपासून आणि इंटरनेटपर्यंत, प्रत्येक गोष्टीसाठी सक्षम आणि चांगल्या अभियंत्यांची गरज असते. आणि अभियंता दिनाचे उद्दिष्ट चांगल्या अभियंत्यांकडे असलेली ही प्रेरणा अधोरेखित करणे हा आहे, जी केवळ आपल्या देशाच्याच नव्हे तर जगाच्या वाढीसाठी आणि विकासासाठी महत्त्वपूर्ण आहे.  अभियंत्याची भूमिका किती महत्त्वाची असू शकते हे समजून घेण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. सर्वांना अभियंता दिनाच्या २०२२ च्या खूप खूप शुभेच्छा!