ईद मुबारक । File Images

रमजान ईद (Ramadan Eid) या सणाने रमजान महिन्याची सांगता केली जाते. महिनाभर रोजे ठेवत अर्थात खास उपवासांच्या माध्यमातून प्रार्थना केली जाते. यंदा रमजान ईद 30 रोजे पूर्ण करत 3 मे दिवशी साजरी केली जाणार आहे. यंदा तब्बल 2 वर्षांनंतर मुस्लिम बांधव कोरोना निर्बंधांमधून मुक्त अशा वातावरणात ईदचा सण साजरा करणार आहे. मग या ईदच्या शुभेच्छा तुमच्या प्रियजणांना मराठमोळ्या शुभेच्छा, ग्रीटिंग्स, Wishes, Shayari, Messages द्वारा देण्यासाठी लेटेस्टली कडून ही खास शुभेच्छापत्र शेअर करत तुम्ही देऊ शकता. 2 मेच्या रात्री चंद्रदर्शनानंतर चांदरात साजरी केली जाईल आणि 3 मे दिवशी सारे मुस्लिम बांधव रमजान ईदचा सण साजरा करणार आहेत.

रमजान ईद ही ईद उल फितर (Eid ul-Fitr) म्हणून देखील ओळखली जाते. ईदच्या निमित्ताने नमाज पठण करताना मुस्लिम बांधव अल्लाह कडे प्रार्थना करताना सुख, समृद्धी आणि शांती ची कामना करतात. हे देखील नक्की वाचा: Eid ul-Fitr Mubarak Wishes: रमजान ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी WhatsApp Status, Messages आणि शुभेच्छापत्रं! 

रमजान ईदच्या हार्दिक शुभेच्छा

ईद मुबारक । File Images
ईद मुबारक । File Images
ईद मुबारक । File Images
ईद मुबारक । File Images

ईदच्या दिवशी सकाळची प्रार्थना सुरू होते. ईदच्या नमाजात हजारो मुस्लिम जमतात आणि नमाज अदा करतात. या दिवशी गोड शेवय्यांसह अन्य पदार्थ बनवले जातात. यासाठीच त्याला 'मीठी ईद' असे सुद्धा म्हटले जाते. ईदीच्या स्वरूपात एकमेकांना भेटवस्तू देखील दिल्या जातात आणि गळाभेट देत एकमेकांना शुभेच्छा देण्याची पद्धत आहे.