Close
Advertisement
 
बुधवार, जानेवारी 15, 2025
ताज्या बातम्या
12 minutes ago

Maharashtra Eid Moon Sighting 2019 Eid Al Fitr Announcement Live Updates: मुंबईः ईदचा चंद्र दिसला; उद्या साजरी होणार रमजान ईद

लाइफस्टाइल Poonam Poyrekar | Jun 04, 2019 08:29 PM IST
A+
A-
04 Jun, 20:29 (IST)

राज्यातील मुस्लिम बांधवांसाठी आनंदाचे वृत्त आहे. उत्तर प्रदेश राज्यात कानपूर, लखनऊ येथेही दिसला ईदचा चांद. देशभरातील विविध ठिकाणी चंद्र दर्शन. भारतभर उद्या साजरी होणार रमजान ईद.

04 Jun, 20:20 (IST)

पुणेः रमजाननिमित्त नेहरूनगर येथील सवकअल्ला जामा मस्जिद येथे करण्यात आलेली आकर्षक विद्युत रोषणाईने उजळून गेली आहे. राज्यातील विविध ठिकाणी ईदचा चाँद दिसल्याने राज्यभरात ईदचा उत्साह साजरा होत आहे.

04 Jun, 20:16 (IST)

नांदेड जिल्ह्यातील मुस्लिम बांधवांची उत्सुकता आणि अतुरताही अखेर संपली असून आकाशात ईदचा चांद दिसला आहे. मुंबई, अहमदनगर, नाशिक आदी ठिकाणी चंद्र दर्शन घडल्यामुळे उद्या राज्यभरात रमजान ईदचा उत्साह पाहायला मिळणार आहे.

04 Jun, 20:11 (IST)

ईद साजरी करण्यासाठी मोठ्या आतुरतेने आकाशाकडे डोळे लाऊन बसलेल्या मुंबईतील मुस्लिम बांधवांना अखेर चंद्र दर्शन घडले आहे. त्यामुळे शहरात ईदचा उत्साह सुरु झाला आहे. ईतचा चंद्र दिसल्याने मुंबई आणि राज्यभरात उद्या साजरी होणार रमजान ईद.

04 Jun, 20:03 (IST)

चंद्र दर्शन घडल्याने अहमदनगरमध्ये ईदचा उत्साह सुरु झाला आहे. आज रात्री आठच्या सुमारास अहमदनगर जिल्ह्यातील राहता येथे चंद्र दर्शन घडले

04 Jun, 19:56 (IST)

मुंबई शहर, उपनगर आणि उपनगरांलगतचा काही भागांत चंद्र दर्शन घडल्याचे वृत्त आहे. प्रामुख्याने वर्सोवा येथे चंद्र दर्शन घडल्याचे वृत्त आहे. मात्र, अद्याप याला अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही.

04 Jun, 19:54 (IST)

जगभरातील इस्लाम धर्मिय बांधवांसाठी पवित्र असलेला रमजान महिना समाप्तीच्या टप्प्यात अल्पावधीतच होऊ शकतं चंद्र दर्शन

04 Jun, 19:49 (IST)

अद्यापही चांद न दिसल्याने ईदसाठी प्रतिक्षाच करावी लागत आहे. ईदची तयारी जय्यद झाली असतानाही चंद्र दर्शन न होणे हे उत्सुकता वाढवणारे आहे.

04 Jun, 19:46 (IST)

ईदच्या जल्लोषासाठी मुस्लिम बांधवांनी जोरदार तयारी केली आहे. मात्र, सर्वांनाच उत्सुकता आहे ती, चंद्र दर्शनाची. अद्याप तरी चंद्र दर्शन घडले नाही. त्यामुळे ही उत्सुकता कायम आहे.

 

04 Jun, 19:43 (IST)

जगभरातील ईद उत्सवावर नजर टाकता संयुक्त राष्ट्र (UAE) च्या मून सायटींग कमिटीने 4 जून रोजीच ईद साजरी करण्याचे ठरवले आहे. या कमिटीनुसार शवालचा महिना मंगळवारपासून सुरु होत आहे.ईद म्हणजेच ईद-उल-फितर हा मुस्लिम धर्मियांचा अत्यंत पवित्र सण म्हणून ओळखला जातो. हा सण इस्लाम धर्मिय मोठ्या उत्साहात साजरा करतात.

 

Load More

Eid Moon Sighting in Maharashtra (Mumbai, Pune,Nashik and Malegaon): रमजानच्या दिवसात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे म्हणजे चंद्रदर्शन. कारण महिनाभर सुरु असलेला रोजा मुस्लिम बांधव चंद्रदर्शन पाहूनच सोडतात. आज रमजान महिन्यातील 29 वा रोजा आहे. आजचे चंद्रदर्शन सर्वात महत्त्वाचे असे मानले जाते. या चंद्रदर्शनाने रोजाची सांगता होईल. आज महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नाशिक आणि मालेगाव या शहरांमध्ये ईदचा चंद्र दिसू शकतो. त्यानंतर उद्या म्हणजेच 5 जून मोठ्या जल्लोषात रमजान ईद हा सण साजरा केला जाईल.

ईदचा हा चंद्र पाहून सर्व मुस्लिम बांधव रोजा सोडतील. 'रमजान ईद' च्या शुभेच्छा देतील. या दिवशी नवीन पोशाख घालून लोक एकत्र जमतात. त्या ठिकाणाला ‘ईदगाह’ म्हणतात. ईदनिमित्त नातेवाईक, मित्रमंडळी यांच्या भेटीगाठी होतात. भेटवस्तू, गिफ्ट्स आणि पंचपक्वान्न यांची रेलचेल असते.

Eid 2019 Special Phirni Recipe: नात्यांमध्ये गोडवा आणणारी मुस्लिम पद्धतीची फिरनी एकदा चाखाच, पाहा रेसिपी

रमजान ईदच्या दिवशी सर्वच मुस्लिम बांधव आपल्या जवळच्या लोकांना, मित्रपरिवाराला, कुटूंबाला ईदी देण्यासाठी भेटतात. एकमेकांना गळाभेट करुन ईदच्या शुभेच्छा देतात. त्यामुळे ह्या ईदला खरा रंग चढेल तो आजच्या चंद्रदर्शनानेच.


Show Full Article Share Now