Close
Advertisement
 
बुधवार, जानेवारी 22, 2025
ताज्या बातम्या
13 minutes ago
Live

Eid Moon Sighting 2023 in Mumbai-Pune-Nashik Highlights: जळगाव मध्ये दिसला चंद्र; 22 एप्रिलला साजरी होणार ईद

लाइफस्टाइल टीम लेटेस्टली | Apr 21, 2023 08:15 PM IST
A+
A-
21 Apr, 19:42 (IST)

महाराष्ट्रात नाशिक, मुंबई पाठोपाठ आता जळगाव  मध्येही चंद्र दर्शन झालं आहे. त्यामुळे आता जळगावातही 22 एप्रिलला यंदा रमजान ईद साजरी होणार आहे.

21 Apr, 19:33 (IST)

मुंबई मध्येही  शव्वाल चा चंद्र दिसला आहे. यामुळे आता नाशिक आणि भारताच्या अन्य प्रांतासोबतच महाराष्ट्राची राजधानी मुंबई शहरामध्येही उद्या 22  एप्रिल दिवशी रमजान ईद साजरी केली जाणार आहे. मुस्लिम बांधव या दिवशी नमाज अदा करून गोडा-धोडाचे पदार्थ ऐकमेकांना देत हा सण साजरा करतील.

21 Apr, 19:29 (IST)

कल्याण, मालेगाव मध्ये झालं चंद्रदर्शन झालं आहे. त्यामुळे महाराष्ट्रात 22 एप्रिलला मुस्लिम बांधव ईदचा आनंद साजरा करू शकणार आहेत. 

21 Apr, 19:24 (IST)

महाराष्ट्रात चंद्र दर्शनाची प्रतिक्षा आहे. पण भारतामध्ये लखनौ, हैदराबाद मध्ये चंद्र दर्शन झाले आहे. 

21 Apr, 18:48 (IST)

शव्वालचा चंद्र पाहण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. याबाबत Ruet-e-Hilal Committees थोड्याच वेळात  निर्णय जाहीर करणार आहेत. दरम्यान आज चंद्र दिसला तर उद्या ईद होईल. अन्यथा 30 रोजे पूर्ण करून 23 एप्रिलला ईदचा आनंद साजरा केला जाणार आहे. 

21 Apr, 18:25 (IST)

आज सूर्यास्तानंतर भारतामध्ये चंद्र दर्शनावर  ईदची तारीख ठरणार आहे. भारतासोबतच पाकिस्तान, बांग्लादेश मध्येही चंद्र दर्शन अद्याप झालेले नाही. त्यामुळे ईद  कधी साजरी होणार? याचा निर्णय होण्याची शक्यता आहे. मगरिब च्या नमाज नंतर त्याचा निर्णय होण्याची दाट शक्यता आहे.  

21 Apr, 18:07 (IST)

Eid Ul Fitr अर्थात रमजान ईद यंदा  22 की 23 एप्रिलला साजरी होणार याचा निर्णय  आज Ruet-e-Hilal Committees घेणार आहेत. शव्वाल महिन्याच्या चंद्रदर्शनावर त्याचा निर्णय घेतला जातो त्यामुळे आजची रात्र महत्त्वाची आहे.  

इस्लामिक पावित्र महिना रमजान आता शेवटच्या टप्प्यामध्ये आला आहे. त्यामुळे मुस्लिम बांधवांना आता रमजान ईदचे वेध लागले आहेत. यंदा चंद्रदर्शनाच्या आधारे भारतात २४ मार्चपासून रमजानचे उपवास सुरू झाले आहेत. त्यामुळे चंद्रदर्शनाच्या आधारेच 29 किंवा 30 दिवस पूर्ण झाल्यानंतर नवा महिना सुरू होतो, चालू महिन्याच्या 29 व्या दिवशी चंद्र दिसला तर तो संपतो आणि नवा महिना सुरू होतो. आणि चंद्र न दिसल्यास 30 दिवस पूर्ण करून नवा महिना सुरू होतो. त्यामुळे रमजान महिन्याची सांगता करून 10 वा आणि नवा महिना शव्वाल महिन्याची सुरूवात ही रमजान ईद आहे. भारतामध्ये केरळ राज्यात उर्वरित भारतापेक्षा एक दिवस आधी ईद साजरी करण्याची रीत आहे. गुरूवार, 20 एप्रिल दिवशी केरळ मध्ये चंद्रदर्शन न झाल्याने आज केरळ मध्ये ईद साजरी केली जाणार नाही. त्यामुळे स्थानिक सरकारने 21-22 असे 2 दिवस रमजान ईदची सुट्टी जाहीर केली आहे.

महाराष्ट्रातील आजच्या चंद्रदर्शनाची स्थिती तुम्हांला लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून वेळोवेळी सांगितली जाणार आहे. त्यामुळे मुंबई, पुणे, नाशिक मधील चंद्रदर्शनाचे अपडेट्स तुम्हांला इथे पाहता येणार आहे.

रमजान ईद, ज्याला ईद-उल-फित्र असेही म्हटले जाते, जगभरातील मुस्लिम हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. ईदच्या निमित्ताने, सामान्यतः मोकळ्या आणि मोठ्या मैदानात मंडळी एक विशेष प्रार्थना करतात. या दिवशी गोडाधोडाचे पदार्थ बनवून एकमेकांची गळाभेट घेऊन रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या जातात.


Show Full Article Share Now