Easy Rangoli Ideas With Marigold Flowers: झेंडूच्या फुलांचा, पानांचा वापर करून झटपट कशी काढाल रांगोळी!
हिंदू धर्मीय पूजा विधिंमध्ये प्रामुख्याने झेंडूच्या फुलांचा वापर करतात. झेंडूचे फूल हे सूर्याचं प्रतिक समजलं जातं. नारंगी आणि पिवळ्या रंगातील झेंडूचा वापर करून तुम्ही पूजा करू शकता. हे रंग आनंद, प्रसन्नता, भक्ती, विजयाचं प्रतिक मानल्या जातात.
Simple Rangoli Designs for Diwali 2020 (File Image)
Floral Deepavali Rangoli Designs: दिव्यांचा उत्सव म्हणजे दिवाळी. आज नरक चतुर्दशी आणि लक्ष्मी पूजन असे दोन महत्त्वाचे दिवस साजरे होत आहेत. दरम्यान हिंदू धर्मामध्ये कोणत्याही धार्मिक कार्यामध्ये रांगोळीला विशेष महत्त्व आहे. अगदी साधी पाना-फुलांची ते अगदी संस्कार भारती रांगोळी अशी विविध प्रकारे रांगोळी काढली जाते. पूर्वीच्या काळी महिला नियमित सडा सारवून सकाळी रांगोळी काढत असे. मात्र आता हळूहळू काळ सरला आणि केवळ सणांपुरता किंवा महत्त्वाच्या दिवशी रांगोळी आवर्जुन काढली जाते. आज संध्याकाळी लक्ष्मीपुजना सण आहे. त्यानिमित्ताने तुम्ही रांगोळी काढण्याचा विचार करत असाल तर पहा रांगोळीमध्ये थोडा झेंडूच्या फुलांचा, पानांचा वापर करून कशी आकर्षक रांगोळी काढू शकाल? Easy Rangoli Design for Diwali 2020: दिवाळीसाठी खास सोप्पी आणि सुंदर रांगोळी काढून साजरा करा दीपोत्सव!