Earth Day 2020 Google Doodle: आजचा दिवस म्हणजेच 22 एप्रिल हा दिवस संपूर्ण जगभरात पृथ्वी दिवस किंवा वसुंधरा दिन (Earth Day) म्हणून साजरा केला जातो. पर्यावरणाच्या संरक्षणासाठी हा दिवस साजरा केला जातो. आज या पृथ्वी दिनाला 50 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने गुगल ने आपल्या खास शैलीत डूडल बनवून वर्धापन दिनाच्या शुभेच्छा तर दिल्याच पण त्याचबरोबर गुगलने या दिनानिमित्त पृथ्वीवरील छोटा पण पर्यावरण संरक्षणात सर्वात महत्त्वाची भूमिका बजावणा-या मधमाशांसाठी समर्पित केला आहे. यासाठी गुगलने खास व्हिडिओ बनविला आहे जो मधमाशांचे महत्व सांगेल.
आजच्या गुगल डूडलवर क्लिक केल्यास एक मधमाशी दिसेल. जी उडत उडत आपले महत्व सांगेल. आज आपण आपला ग्रह आणि पर्यावरणाचील व्यवस्था सुरु ठेवण्यास मदत करणा-या सूक्ष्म जीवांच्या अस्तित्वाचा आनंदोत्सव साजरा करत असून त्यात सर्वात महत्वाचा जीव मधमाशीसाठी हे खास डूडल आहे असे या व्हिडिओत म्हटले आहे.
परागकणांद्वारे जगभरातील दोन तृतीयांश पिके तयार करण्यात मधमाशी महत्त्वाची भूमिका बजावतात. त्याचबरोबर जगातील 85% फुलझाडे बहरण्यासाठी देखील मधमाशी उपयुक्त ठरतात. त्यामुळे अशा या पंख असलेल्या मित्र-मैत्रिणींबाबत अधिक जाणून घेण्यासाठी आणि परागकण मिळविण्याच्या प्रवासाबद्दल माहिती करुन देण्यासाठी गुगल हा खास व्हिडिओ बनविला आहे.
उष्णकटिबंधीय जंगलापासून ते घरांच्या बागांमधील नैसर्गिक अधिवास वाढीसाठी मधमाशांचे परागसिंचन हे महत्वपूर्ण भूमिका बजावते असे यात म्हटले आहे. हे Doodle बनविण्यामागचा मूळ उद्देश म्हणजे जगाला धरती आणि मानवतेवर आधारित अशा मधमाशांचे महत्व समजावे.