Dussehra 2019: आंब्याची पाने आणि झेंडूच्या फुलांचे आकर्षक तोरण लावून सजवा तुमचे घर; या सोप्प्या ट्रिक्स करतील मदत (Watch Video)
Zendu Toran (Photo Credits: Youtube)

विजयादशमी (Vijayadashmi) म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय साजरा करण्याचा सण , महाराष्ट्रात हा सण दसरा (Dussehra) म्हणून सुद्धा ओळखला जातो.  भारतातील काही भागात या दिवशी रामाने रावणाचा तर काही भागात दुर्गा देवीने महिषासुर राक्षसाचा वध केल्याचे मानतात.  यंदा 8 ऑक्टोबर रोजी विजयादशमी साजरी होणार आहे, त्यामुळे अनेकांकडे आतापासूनच घराच्या स्वच्छतेला आणि सुशोभीकरणाला सुरुवात झाली आहे. दसऱ्याच्या दिवशी आंब्याची पाने आणि झेंडूची फुले यांचा वापर करून बनवलेल्या तोरणाला खास महत्व असते.साहजिकच त्यामुळे सण जवळ आला की या वस्तूंची किंमत वधारायला सुरुवात होते, आणि त्यातही रेडिमेड तोरण आणायचे म्हणजे खिश्याला चांगलीच कात्री बसते, हे टाळण्यासाठी यंदा तुम्ही घरच्या घरी या काही सोप्प्या ट्रिक्स वापरून अगदी बाजारातून आणल्याचे भासेल इतके आकर्षक तोरण बनवू शकता.

सामग्री:

झेंडूची फुले (पिवळी, विटकरी, नारंगी) आंब्याची पाने, जाड दोरा, सुई

Dussehra 2019 Date: यंदा दसरा, विजयादशमी कधी साजरी केली जाणार? पहा पूजा विधीचे शुभ मुहूर्त

पाहा व्हिडीओ

झेंडूची फुले आणि आंब्याची पाने यांचे तोरण बनवताना काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे, तुम्ही जी फुले पाने वापरणार आहात त्यांचा आकार शकतो समान असेल असे निवडा, ही सामग्री स्वच्छ असणे अति आवश्यक आहे, त्यामुळे तोरण बनवण्याआधी एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. सुकलेली वा किंचितही कुजलेली फुले पाने घेणे प्रकर्षाने टाळावे.