Eid Mehndi Design (फोटो सौजन्य - You Tube)

Eid Mehndi Design: ईद-उल-फित्र हा इस्लामच्या प्रमुख सणांपैकी एक आहे. रमजानच्या पवित्र महिन्याच्या शेवटी साजरा केला जाणारा हा सण मिठी ईद म्हणूनही ओळखला जातो. या दिवशी शेवया खीर बनवली जाते. रमजान महिना संपल्यानंतर, ईदची तारीख चंद्र दिसल्यावरच कळते. यावेळी रमजानचा पवित्र महिना 2 मार्च रोजी सुरू झाला. इस्लामिक कॅलेंडरनुसार, रमजान नंतर शव्वाल महिन्याच्या पहिल्या तारखेला ईद-उल-फित्र साजरी केली जाते. आता शव्वालचा चंद्र दिसणार त्या दिवशी ईद साजरी केली जाईल. जर 30 मार्चच्या रात्री शव्वालचा चंद्र दिसला तर ईद 31 मार्च म्हणजेच सोमवारी साजरी केली जाईल. त्याचप्रमाणे, जर 31 मार्चच्या रात्री चंद्र दिसला तर ईद 1 एप्रिल म्हणजेच मंगळवारी असेल.

ईदनिमित्त महिला हातावर खास मेहंदी काढतात. तुम्ही देखील ईदसाठी स्पेशन मेहंदी डिझाइन्स शोधत असाल तर आम्ही तुमच्यासाठी काही खास ईद मेहंदी डिझाइन (Eid Mehndi Design) घेऊन आलो आहोत. तुम्ही त्या आपल्या हातावर काढून या सणाचा आनंद आणखी द्विगुणित करू शकता.

रमजान ईद स्पेशल मेहंदी डिझाइन, व्हिडिओ -

 

सरकारी कॅलेंडरनुसार, भारतात ईद-उल-फित्रची सुट्टी 31 मार्च 2025 रोजी म्हणजेच सोमवार रोजी जाहीर करण्यात आली आहे. तथापि, ईद कधी साजरी करायची हे चंद्र दिसण्यावरून ठरवले जाईल. पाकिस्तानमध्ये 31 मार्च 2025 रोजी ईद साजरी केली जाऊ शकते. त्याचप्रमाणे सौदी अरेबियामध्येही 31 मार्च रोजी ईद साजरी होण्याची शक्यता आहे.