भीम जयंती । File Image

'आधुनिक भारताचे शिल्पकार' असलेले डॉ.बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांचा जन्म दिवस हा भीम जयंती (Bhim Jayanti) म्हणून साजरा केला जातो. 14 एप्रिल 1891 दिवशी जन्माला आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पहिल्यांदा सार्वजनिक जयंती सदाशिव रणपिसे यांनी १४ एप्रिल १९२८ रोजी पुण्यात साजरी केली. त्यानंतर 14 एप्रिल हा दिवस भीम अनुयायींसोबतच देशातील सर्वसामान्य नागरिकांसाठी देखील खास झाला. मग या दिवसाचं औचित्य साधत तुम्ही देखील मित्र मैत्रिणी, नातेवाईक, प्रियजनांना आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा देऊ शकता. त्यासाठी लेटेस्टली मराठी कडून तयार करण्यात आलेली खालील शुभेच्छापत्र शेअर करत हा दिवस आनंदामध्ये साजरा करू शकता.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त महाराष्ट्र सह देशभर अनेक ठिकाणी शासकीय सुट्टी जाहीर केली जाते. भारतीय बौद्ध धर्मीय बुद्ध विहार तसेच आपल्या घरातील आंबेडकरांच्या प्रतिमेला वा पुतळ्याला अभिवादन करतात.ढोल वाजवून नृत्य करत आनंद व्यक्त करून मिरवणूक काढतात. Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 2025: बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त जाणून घ्या महामानवा बद्दल काही खास गोष्टी .

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा

भीम जयंती । File Image
भीम जयंती । File Image
भीम जयंती । File Image
भीम जयंती । File Image
भीम जयंती । File Image

 

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रतिकूल स्थितीवर मात करून शिक्षण पूर्ण केले. कायद्याची पदवी घेत बॅरिस्टर झाले. भारतीय राजकारणामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे. आंबेडकरांनी भारताचे संविधान लिहले आहे. दलितांना समाजात मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचे महत्त्वाचे काम त्यांनी केलेच आहे पण त्यासोबतच दलितेतर लोकही आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या उत्साहाने त्यांची जयंती साजरी करतात.