Friendship Day च्या शुभेच्छा देण्यासाठी आपल्या मित्रांसोबत Video Calling दरम्यान 'या' भन्नाट गोष्टी करुन द्या Surprise!
Friendship Day Video Calling (Photo Credits: Pexels)

ज्या नात्यात कोणतीही बंधने नसतात, अटी-नियम नसतात. ज्यात Incoming फ्री असते मात्र Outgoing कधीच नसतं असं नातं म्हणजे मैत्रीचे (Friendship) नातं! या नात्याचा सन्मान करण्याचा खास दिवस ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी साजरा केला जातो. फ्रेंडशिप डे (Friendship Day) म्हणून साजरा केला जाणारा हा दिवस यंदा 2 ऑगस्टला आला आहे. या दिवशी सर्व मित्र-मैत्रिणी एकत्र येऊन एकमेकांच्या हातावर छान फ्रेंडशिप बँड बांधून हा सण साजरा करतात. मात्र यंदा कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊन मुळे या आनंदावर काहीसे विरजण पडले आहे. असे असले तरीही तुम्ही तंत्रज्ञानाच्या युगात व्हिडिओ कॉलिंगच्या माध्यमातून तुमच्या लाडक्या मित्र-मैत्रिणींना जबरदस्त सरप्रायजेस देऊ शकता.

कदाचित या सरप्रायजेसने त्यांना कदाचित सुखद धक्का बसेल. मित्रांना यंदा भेटता येणे शक्य नसल्याने व्हिडिओ कॉलिगंच्या माध्यमातून काही हटके आणि भन्नाट गोष्टी करुन हा दिवस साजरा करु शकतात.Friendship Day 2020: फ्रेंडशीप डे निमित्त घराच्या घरी Friendship Bands कसे बनवाल?

व्हिडिओ कॉलिंग दरम्यान काय कराल?

1. तुमच्या मित्राने तुम्हाला लूक मध्ये (हेअरकट, फिटनेस, दाढी, ड्रेसिंग) काही बदल करायला सांगितला असेल तर तो करा आणि व्हिडिओ कॉलमध्ये दाखवा.

2. तुमच्या मित्र-मैत्रिणींसाठी त्याचे आवडते गाणे गा वा छानसं नृत्य सादर करा.

3. जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी मजेशीर फोटोज, व्हिडिओज शेअर करा.

4. ग्रुप कॉलिंग करुन छान अंताक्षरी, हौजी, दम शे राज सारखे गेम खेळा.

5. मित्रासाठी खास ग्रिटिंग बनवले असेल, गाणे, कविता, चारोळी, शायरी तयार केली असेल तर ती बोलून दाखवा.

या व्हिडिओ कॉलिंग अथवा ग्रुप कॉलिंगचा छान स्क्रीनशॉट काढून तो मित्राला पाठवा. तुम्हा दोघांकडे छानशी आठवण तुम्हा दोघांकडे राहील. यंदा सोशल डिस्टंसिंगमुळे तुम्हाला जरी तुमच्या मित्राला भेटता आले नाही तरी या माध्यमातून तुम्ही फ्रेंडशिप डेच्या दिवस अगदी आनंदात आणि उत्साहात साजरा करु शकता.