Diwali 2024 Greetings

Diwali 2024 Greetings: भारतात लवकरच पाच दिवसीय दीपोत्सवातील सर्वात महत्त्वाचा सण, दिवाळी, देशभरात साजरा केला जाणार आहे. वाईटावर चांगल्याचा विजय आणि अंधारावर प्रकाशाचा सण देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे. दिवाळीचा इतिहास रामायण काळाशी संबंधित आहे आणि प्रचलित पौराणिक मान्यतेनुसार, लंकापती रावणाचा वध केल्यानंतर, भगवान श्री राम माता सीता आणि लक्ष्मणासोबत चौदा वर्षांचा वनवास संपवून अयोध्या नगरी परतले. श्रीरामाच्या आगमनाच्या आनंदात लोकांनी संपूर्ण अयोध्या शहर दिव्यांच्या रोषणाईने उजळून टाकले होते, तेव्हापासून दीपोत्सव साजरा केला जात असल्याचे सांगितले जाते. हा हिंदू धर्मातील सर्वात महत्त्वाचा सण आहे, ज्याची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत असतो.  दिवाळी म्हणजेच लक्ष्मीपूजनाचा सण कार्तिक महिन्यातील अमावास्येला साजरा केला जातो. पाच दिवसांच्या दिवाळी सणातील हा तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा सण आहे, जो कार्तिक कृष्ण त्रयोदशीला धनत्रयोदशीपासून सुरू होतो आणि कार्तिक शुक्ल द्वितीयेला भाऊ दूजला संपतो. दिवाळीच्या या शुभ प्रसंगी, तुम्ही तुमच्या प्रियजनांना या मराठी शुभेच्छा, कोट्स, GIF ग्रीटिंग्ज, फोटो मेसेज, व्हॉट्सॲप स्टिकर्सद्वारे मनापासून शुभेच्छा देऊ शकता.

येथे पाहा, दिवाळीनिमित्त पाठवता येणारे खास संदेश 

दिवाळी अशी खास,
तिच्यात लक्ष्मीचा निवास…
फराळाचा सुगंधी वास,
दिव्यांची आरास…
मनाचा वाढवी उल्हास,
अशा दिवाळीच्या मन:पूर्वक शुभेच्छा!
Diwali 2024 Greetings
Diwali 2024 Greetings
स्नेहाचा सुगंध दरवळला,
आनंदाचा सण आला.
विनंती आमची परमेश्वराला,
सौख्य, समृध्दी लाभो तुम्हाला.
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
Diwali 2024 Greetings
Diwali 2024 Greetings
फटाके, कंदील अन्
पणत्यांची रोषणाई
चिवडा-चकली, लाडू करंजीची ही
लज्जतच न्यारी,
नव्या नवलाईची दिवाळी येता
आनंदली दुनिया सारी!
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!
Diwali 2024 Greetings
Diwali 2024 Greetings
दिपावलीपासून ते भाऊबीजेपर्यंतच्या,
साजरा होत असलेल्या आनंदमयी, उत्साही,
मंगलमय पर्वानिमित्त आपणास व आपल्या
परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…!
Diwali 2024 Greetings
Diwali 2024 Greetings
दिवाळीचा पहिला दिवा लागता दारी,
सुखाचे किरण येती घरी,
पूर्ण होवोत तुमच्या सर्व इच्छा,
आमच्याकडुन दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
Diwali 2024 Greetings
Diwali 2024 Greetings

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

Diwali 2024 Greetings
Diwali 2024 Greetings

उल्लेखनीय आहे की यावर्षी दिवाळी सण 28 ऑक्टोबर  ते 3 नोव्हेंबर या कालावधीत साजरा केला जात आहे, तर दिवाळी म्हणजेच लक्ष्मीपूजन  (1 नोव्हेंबर 2024  आहे. हा भारतातील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा सण आहे. भारतात साजरे होणाऱ्या सर्व सणांपैकी दिवाळीला सामाजिक आणि धार्मिक महत्त्व असल्याचे सांगितले जाते, ज्याला दीपोत्सव असेही म्हणतात. ही दिवाळी हा स्वच्छतेचा आणि प्रकाशाचा सण आहे, ज्याची तयारी अनेक दिवस आधीच सुरू होते. लोक आपली घरे स्वच्छ करतात आणि दिवाळीसाठी खास सजावट करतात. यासोबतच घराचा प्रत्येक कोपरा दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघतो.