Diwali 2023 Muhurat Trading Date and Time: दिवाळी मध्ये मुहूर्त ट्रेडिंग साठी यंदा पहा बाजार कधी, किती वाजता खुला होणार?
Representational Image (Credits: Wikimedia Commons)

Diwali Muhurat Trading 2023 Date & Time: इंडियन स्टॉक मार्केट्स दिवाळी मध्ये नॉर्मेल ट्रेडिंग बंद राहणार आहे. दिवाळीच्या मुहूर्त ट्रेडिंग (Muhurat Trading) सत्रासाठी भारतीय शेअर बाजार एका तासासाठी उघडतील, ज्यामुळे गुंतवणूकदारांना सणासुदीच्या दिवशी झटपट पैसे मिळवण्याची संधी मिळेल. दिवाळीच्या सणामध्ये लक्ष्मीपूजना दिवशी संवत वर्षाची सुरूवात असल्याने हिंदू धर्मीय नव्या वर्षाची सुरूवात खास गुंतवणूक करून करतात. या सणाच्या दिवशी संपूर्ण दिवस मार्केट बंद असते पण केवळ तासभरासाठी ते खुलं ठेवलं जातं. या खास ट्रेडिंग द्वारा लक्ष्मी मातेची पूजा केली जाते. हिंदू धर्मीयांच्या मते, लक्ष्मी माता ही धन संपत्तीची, सौभाग्याची देवता आहे. मुहूर्त ट्रेडिंग द्वारा संवत वर्ष 2080 ची सुरूवात होणार आहे. या दिवसाचं औचित्य साधून नव्या व्यवहारांची सुरूवात केली जाते.

यंदा बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज मध्ये मुहुर्ताचा ट्रेडिंग सेशन 12 नोव्हेंबर दिवशी होणार आहे. संध्याकाळी 6 ते 7.15 दरम्यान या मुहूर्ताची वेळ आहे. मुहूर्त ट्रेडिंग हे विशेष सत्र आहे. जिथे व्यापारी आणि गुंतवणूकदार नवीन वर्षाची सुरुवात करण्यासाठी टोकन ट्रेडमध्ये पंच करू शकतात.

अनेक गुंतवणूकदारांचा असा विश्वास आहे की मुहूर्त ट्रेडिंग दरम्यान स्टॉक खरेदी केल्याने त्यांना वर्षभर नशीब फळफळते आणि संपत्ती मिळते. स्टॉक ट्रेडर्स दिवाळीच्या दिवशी नवीन सेटलमेंट खाते सुरू करतात. हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की मुहूर्त ट्रेडिंग हे एक तासाचे ट्रेडिंग सत्र आहे आणि बाजारातील हालचाली अस्थिर असू शकतात.

मुहूर्त ट्रेडिंग सत्रादरम्यान केलेले सर्व व्यवहार त्याच दिवशी निकाली काढले जातात. सर्व व्यवहारांचे सेटलमेंट करण्यासाठी साधारणपणे 15 मिनिटांचे प्री-ओपनिंग सेशन आणि क्लोजिंग सेशन असते.

2022 मध्ये मुहूर्त ट्रेडिंगमध्ये सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही प्रत्येकी 0.88% वाढले, तर 2021 मध्ये दोन्ही निर्देशांक प्रत्येकी 0.49% वर गेले होते.