Happy Deepavali Marathi Wishes and Messages: महाराष्ट्रामध्ये दिवाळी सणाची खरी धूम नरक चतुर्दशी (Narak Chaturdashi) दिवसापासून होते. अश्विन कृष्ण चतुर्दशी म्हणजेच नरक चतुर्दशीचा सण यंदा 27 ऑक्टोबर दिवशी साजरा केला जाणार आहे. यंदा नरक चतुर्दशी आणि लक्ष्मी पूजन (Laxmi Pujan) एकाच दिवशी आल्याने दुहेरी सेलिब्रेशनने दिवाळी सणाची सुरूवात होणार आहे. मग दिवाळी, दीपावली सणाचं औचित्य साधून अनेकजण फेसबूक मेसेंजर, व्हॉट्सअॅप स्टेटस द्वारा दिवाळीच्या शुभेच्छा, दीपावलीच्या मराठमोळ्या शुभेच्छा देण्यासाठी खास ग्रीटिंग्स, HD Images शेअर करुन हा दिवस खास बनवतात. मग हिंदू धर्मीयांच्या सणांमधील सार्या सणांचा राजा अशी ओळख असलेल्या दिवाळीच्या शुभेच्छा (Diwali Wishes) तुम्हांला मित्र परिवारासोबत, मित्रमैत्रिणींना देण्यासाठी ही मराठमोळी ग्रीटिंग्स, शुभेच्छापत्र, SMS,संदेश, मेसेजेस नक्की शेअर करा आणि तुमचा आनंद द्विगुणित करा. Happy Diwali 2019 Messages: दिवाळीच्या मराठमोळ्या शुभेच्छा, संदेश, मेसेज, ग्रीटींग्स आणि शुभेच्छापत्रं!
दिवाळी किंवा दीपावली या नावाने ओळखला जाणारा हा सण भारतासह परदेशात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. उत्तर भारतामध्ये नरक चतुर्दशी दिवशी छोटी दिवाळी साजरी करण्याची प्रथा आहे. नरक चतुर्दशी दिवशीच कृष्णाने नरकासूराचा वध केला आहे. अयोद्धेमध्येही वनवास संपवून भगावान राम आणि सीता पोहचले तेव्हा या लोकांनी दिव्यांची आरास करून जल्लोषात त्यांचे स्वागत केले. आज 21 व्या शतकात जसा काळ बदलला तसं सेलिब्रेशनदेखील बदललं आहे. दिवाळीच्या शुभेच्छा डिजिटल युगात सोशल मीडियाच्या विविध माध्यमातून शेअर करताना व्हॉट्सअॅप, ट्विटर, फेसबूक, इंस्टाग्राम द्वारा शेअर करायला विसरू नका. Diwali 2019 Rangoli Designs: पाना-फुलांच्या मदतीने आकर्षक दिवाळी रांगोळी कशी बनवाल?
दिवाळी आणि नरक चतुर्दशीच्या मराठमोळ्या शुभेच्छा
उटण्याचा मंद सुगंध घेऊन,
आली आज नरक चतुर्दशीची पहाट,
पणतीतल्या दिव्याच्या तेजाने,
उजळेल आयुष्याची वहिवाट
तुम्हांला आणि तुमच्या परिवाराला
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
स्नेहाचा सुगंध दरवळला,
आनंदाचा सण हा आला
विनंती आमची परमेश्वराला,
सौख्य, समृध्दी लाभो तुम्हाला.
दिवाळीच्या लक्ष्य लक्ष्य शुभेच्छा!
गोवर्धन पूजा, लक्ष्मीपूजा, दीपपूजा दिवाळीला,
उधाण येवो आनंद, उत्साह अन हर्षउल्लासाला,
वंदन करूया मनोभावे आज त्या मांगल्याला,
दिवाळीच्या तुम्हांला मनःपूर्वक शुभेच्छा!
रांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे दीप उजळू दे,
लक्ष्मीच्या सोनेरी पावलांनी
तुमच्या घरी घर सुख समृद्धी येऊ दे
नरक चतुर्दशी आणि दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
उत्कर्षाची वाट उमटली
विरला गर्द कालचा काळोख
क्षितिजावर पहाट उगवली
घेऊनिया नवा उत्साह
दिवाळीच्या हार्दीक शुभेच्छा!
दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी GIFs
दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी व्हिडिओ संदेश
दिवाळी हा हिंदू धर्मीयांसाठी एक मोठा सण आहे. दिवाळीची सुरूवात वसुबारस पासून होते. त्यानंतर धनतेरस, नरक चतुर्दशी, लक्ष्मी पूजन, दिवाळी पाडवा, भाऊबीज असे सण दिवाळीमध्ये साजरे केले जाते. दरम्यान दिवाळीच्या दिवसात आकर्षक रांगोळी, दिव्यांची आरास करून सेलिब्रेशन केले जाते. लेटेस्टली परिवाराकडून तुम्हा सार्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा! हॅप्पी दिवाली.