Diwali Message In Marathi | File Image

Diwali and Narak Chaturdashi Marathi Messages:  भारतामध्ये हिंदू धर्मात सणांच्या माध्यमातून आपल्या संस्कृतीचं दर्शन होतं. दीपावली (Deepavali) किंवा दिवाळी (Diwali) हा सणांचा राजा म्हणून ओळखला जाणार आहे. यंदा 25 ऑक्टोबर दिवशी धनतेरस (Dhanteras) आणि वसूबारस (Vasubaras) हे दोन एकत्र आल्याने दुहेरी आनंदाच्या सेलिब्रेशनने यंदा दिवाळ सणाची नांदी झाली आहे. दिवाळीची महाराष्ट्रात खरी सुरूवात होते ती नरक चतुर्दशी  (Narak Chaturdashi) दिवशी पहिल्या आंघोळीने! मग यंदा नरक चतुर्दशी म्हणजेच दिवाळीची खरी धूम 27 ऑक्टोबर पासून होणार आहे. मग या सणाचा जल्लोष, आनंद मित्र मैत्रिणी, नातेवाईक, आप्तजनांसोबत साजरा करण्यासाठी नरक चतुर्दशी आणि दिवाळीच्या शुभेच्छा (Diwali Wishes) सोशल मीडियात व्हॉट्सअ‍ॅप, फेसबूकच्या माध्यमातून शेअर करून हा सण मोठ्या जल्लोषात साजरा करा. प्रदुषण टाळण्यासाठी यंदा इको फ्रेंडली दिवाळी साजरी करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. मग डिजिटल मीडियाच्या माध्यमातून दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी ही खास मराठमोळी ग्रीटिंग्स, शुभेच्छापत्र, मेसेज, SMS, HD Images यांच्या माध्यमातून शुभेच्छा देण्यासाठी आम्ही ही खास ग्रीटिंग्स आणि मेसेजेस घेऊन आलो आहोत मग पहा दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी हे खास मेसेजेस! नक्की वाचा:  Happy Diwali 2019 Wishes: दिवाळी शुभेच्छा मराठी संदेश, ग्रीटिंग्स, SMS, Messages,GIFs, Images, WhatsApp Status च्या माध्यमातून शेअर करून साजरा करा नरक चतुर्दशीचा सण!

दिवाळी सणाची अश्विन शुक्ल द्वादशी दिवशी वसूबारस सणापासून सुरूवात होते. त्यानंतर धनतेरस किंवा धनत्रयोदशीचा सण असतो. अश्विन शुक्ल चतुर्दशी दिवशी नरक चतुर्दशी, त्यानंतर लक्ष्मी पूजन, दिवाळी पाडवा, भाऊबीज साजरी केली जाते. मग पहा नरक चतुर्दशी आणि दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठमोळे मेसेजेस. हेही वाचा:  Diwali Gifts 2019: दीपावलीला तुमच्या मित्रांसाठी आणि नातेवाईकांसाठी घ्या ‘हे’ खास गिफ्ट्स.

दिवाळी आणि नरक चतुर्दशीच्या शुभेच्छा देण्यसाठी खास मराठी मेसेजेस

 

Diwali Message In Marathi | File Image

व्हॉट्सअ‍ॅप फॉर्वर्ड्स: 

दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी,

इडा–पिडा जाऊ दे, बळीचं राज येऊ दे!

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

Diwali Message In Marathi | File Image

व्हॉट्सअ‍ॅप फॉर्वर्ड्स:

लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून निघो ही निशा,

घेऊन येवो नवी उमेद नवी आशा,

सोबत आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

Diwali Message In Marathi | File Image

व्हॉट्सअ‍ॅप फॉर्वर्ड्स:

फटाके, कंदील अन् पणत्यांची रोषणाई,

चिवडा-चकली, लाडू-करंजीची ही लज्जतच न्यारी,

नव्या नवलाईची दिवाळी येता, आनंदली दुनिया सारी!

दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!

Diwali Message In Marathi | File Image

व्हॉट्सअ‍ॅप फॉर्वर्ड्स:

पहिला दिवा आज दारी लागला, सुखाची किरणे येई घरी,

पूर्ण होवो तुमच्या सर्व इच्छा, दीपावलीच्या मंगलमय शुभेच्छा!

शुभ दीपावली

Diwali Message In Marathi | File Image

व्हॉट्सअ‍ॅप फॉर्वर्ड्स:

रांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे दीप उजळू दे,

लक्ष्मीच्या पावलांनी घर सुख समॄध्दीने भरू दे

दीपावली आणि नरक चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा!

दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा 

नरक चतुर्दशी हा सण अश्विन कृष्ण चतुर्दशी दिवशी साजरा केला जातो. या दिवशी दिवाळी मधील पहिले अभ्यंगस्नान केले जाते. नरक चतुर्दशी दिवशी श्रीकृष्णाने नरकासूराचा वध केला अशी देखील अख्यायिका आहे त्यामुळेजो नरक चतुर्दशी दिवशी जो अभ्यंगस्नान करेल त्याला नरकाची पीडा होणार नाही असा आशीर्वाद मिळतो ही प्रथा आहे.