Diwali 2018: लक्ष्मी पूजन करण्याचा शुभ मुहूर्त कोणता ? लक्ष्मी प्रसन्न करण्यासाठी कशी कराल पूजा ?
लक्ष्मीपूजन मुहूर्त Photo credit: Instagram

नरक चतुर्दशीनंतर दिवाळीच्या दिवसामध्ये मोठ्या उत्साहाने साजरा केला जाणारा एक सण म्हणजे लक्ष्मीपूजा. आज ( 7 नोव्हेंबर 2018 ) देशभरात लक्ष्मीपूजन मोठ्या उत्साहाने साजरे केले जाणार आहे. वर्षभर घरात धन, संपत्ती यावी आणि ती टिकून रहावी याकरिता लक्ष्मीपूजन केले जाते. दिवाळीच्या दिवसात आश्विन अमावस्येच्या रात्री लक्ष्मी सर्वत्र संचार करते त्यामुळे लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आज पूजा केली जाते. लक्ष्मी पावलं रांगोळीच्या माध्यमातून अशा '7' प्रकारे काढाल तर घरात नक्की प्रवेश करेल लक्ष्मी

लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त कोणता ?

आज सायंकाळी 6.01 ते 8.33 मिनिटांपर्यंतच्या काळात लक्ष्मीपूजन केले जाऊ शकते.  अमावस्या आज रात्री 9.31 मिनिटांनी समाप्त होत आहे. त्यामुळे या वेळे आधीच पूजा करणं अधिक लाभदायक आहे. लक्ष्मीच्या प्रतिमेसोबतच आज पूजेच्या वेळेस घरातील धनसंपत्ती, सोन्या, चांदीचे दागिने आणि झाडूचीदेखील पूजा केली जाते. तसेच प्रसादामध्ये एखादा गोडाचा पदार्थ ठेवला जातो.  जाणून घ्या काय आहे लक्ष्मीपूजनाचे महत्व; त्यामागील कथा काय ?  

लक्ष्मीपूजनादिवशी पूजा कशी कराल ?

लक्ष्मीपूजनासाठी पाटावर मूठभर तांदूळ पेरून त्यावर तांब्याचा कलश ठेवा. कलशाला हळदी-कुंकवांच्या प्रत्येकी 5 उभ्या रेषा काढाव्यात. कलाशामध्ये प्रत्येकी 5 पानांच्या 5 जुड्या ठेवा त्यावर नारळ ठेवून घट बनवा. या घटावर वेणी ठेवून नारळाला हळदी- कुंकू लावा. या पूजेमध्ये लक्ष्मीची एक प्रतिमा ठेवा. सोबत 5 फळांचा आणि गोडाचा पदार्थ ठेवून पूजा करा. या पूजेदरम्यान काही जण लक्ष्मीची कथेचे वाचन करतात.  दुसर्‍या दिवशी सकाळी या मांडलेल्या पूजेची उत्तरपुजा करून घट  हलवला जातो.