हिंदू धर्मातील वर्षातील सर्वात मोठा सण दिवाळी (Diwali 2021) येऊ घातला आहे. तब्बल 5 दिवस चालणाऱ्या या सणाची सुरुवात वसुबारस पासून होते. यंदा वसुबारस 1 नोव्हेंबर दिवशी आहे. त्यानंतर धनत्रयोदशीचा (Dhantrayodashi 2021) दिवस साजरा होतो. यंदा 2 नोव्हेंबर धनत्रयोदशी दिवशी आहे. या दिवशी आयुर्वेदाची देवता धन्वंतरीची पूजा केली जाते. धनत्रयोदशी ही आश्विन महिन्याच्या 13 व्या दिवशी असते. या दिवशी देवांचा वैद्य धन्वंतरी याचा जन्म झाला असा समज आहे. व्यापारी वर्गात या पूजेचे महत्त्व विशेष असते. या दिवशी संध्याकाळी दुकानांमध्ये पूजा केली जाते. हिशेबाच्या नव्या वह्यांचा वापर या दिवसापासून सुरू करण्याचा प्रघात आहे.
असुरांबरोबर इंद्रदेव यांनी महर्षि दुर्वास यांच्या शाप निवाराणास समुद्र मंथन केले, तेव्हा त्यातुन देवी लक्ष्मी प्रगट झाली. तसेच समुद्र मंथनातून धन्वंतरी अमृतकुंभ बाहेर घेऊन आला, म्हणून या दिवशी धन्वंतरीची व लक्ष्मी मातेची पुजा केली जाते. तर यंदाच्या धनत्रयोदशीला खास मराठी Messages, Wishes, WhatsApp Status, HD Images च्या माध्यमातून शुभेच्छा द्या.
दरम्यान, धनत्रयोदशीला घरात नवीन झाडू किंवा सूप खरेदी करून त्याची पूजा करतात. सायंकाळी दीप प्रज्वलन करून घर आणि दुकानाची पूजा करतात. यादिवशी मंदिर, गोशाळा, घाट, विहीर, तलाव, बागेत दिवा लावण्याचा प्रघात आहे. तसेच या दिवशी तांबे, पितळ, चांदीच्या गृहोपयोगी वस्तू व आभूषणाची खरेदी केली जाते.