दिवाळी सेलिब्रेशन मध्ये वसूबारस नंतर साजरा केला जाणारा सण म्हणजे धनतेरस (Dhanteras) किंवा धनत्रयोदशी (Dhantrayodashi). कार्तिक कृष्ण त्रयोदशी दिवशी हा सण साजरा केला जातो. या निमित्ताने धनाची देवता कुबेर आणि लक्ष्मीची पूजा केली जाते. सोबतच या दिवशी आयुर्वेदाची देवता धन्वंतरीची देखील पूजा करण्याची रीत आहे. आयुर्वेदाचे अभ्यासक त्यानिमित्ताने धन्वंतरीचं पूजन करतात. हा दिवस त्यांच्यासाठी आयुर्वेद दिवसही असतो. मग दिवाळी च्या पर्वातील या शुभ दिनी तुमच्या नातेवाईकांना, आप्तेष्टांना धनतेरसच्या शुभेच्छा WhatsApp Status, Facebook Messages, Wishes, Images, Greetings द्वारा शेअर करत त्यांचाही दिवस खास करू शकता.
धनतेरस दिवशी सोनं, चांदी, पितळ यांची खरेदी केली जाऊ शकते. तिन्ही सांजेला दारासमोर दिवा लावला जातो. घरात लक्ष्मी आणि कुबेराच्या प्रतिमेचं पूजन केले जाते. Happy Diwali 2023 In Advance Messages: दिवाळीच्या शुभेच्छा अॅडव्हान्स मध्ये देण्यासाठी खास WhatsApp Status, Facebook Messages!
धनत्रयोदशीच्या शुभेच्छा
पहिला दिवा आज लागेल दारी,
सुखाचा किरण येईल तुमच्या घरी,
पूर्ण होवो तुमच्या सर्व इच्छा
तुम्हाला धनत्रयोदशी हार्दिक शुभेच्छा
धनत्रयोदशीच्या दिवशी दिवा लागतो दारी,
कंदील पणत्यांनी उजळून निघते दुनिया सारी,
फराळ फटाक्यांची तर मजाच निराळी,
मिळून सारे साजरे करू
आली रे आली दिवाळी आली
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा
रांगोळीच्या सप्तरंगात,
सुखाचे दीप उजळू दे,
लक्ष्मीच्या मंगल पावलांनी
तुमचे घर आनंदाने भरू दे…
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा !
धनं धान्यं पशुं बहुपुत्रलाभं सत्सम्वत्सरं
दीर्घ मायुरस्तु अमृतमयी मंगलमय हो,
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा!
लक्ष्मी आली तुमच्या दारी,
सुख समृद्धी व शांती घेऊन घरी…
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा
असुरांबरोबर इंद्रदेव यांनी महर्षि दुर्वास यांच्या शाप निवाराणास समुद्र मंथन केले, तेव्हा त्यातुन देवी लक्ष्मी प्रगट झाली. तसेच समुद्र मंथनातून धन्वंतरी अमृतकुंभ बाहेर घेऊन आला, म्हणून या दिवशी धन्वंतरीची व लक्ष्मी मातेची पुजा केली जाते. धनत्रयोदशीला घरात नवीन झाडू किंवा सूप खरेदी करून त्याची पूजा करण्याची पद्धत आहे.