Maha Kunbha | X

प्रयागराज (Prayagraj) मध्ये सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यामध्ये आज ( 3 फेब्रुवारी) चौथं शाही स्नान संपन्न झालं आहे. वसंत पंचमी (Basant Panchami) चा मुहूर्त साधत हे शाही स्नान संपन्न झालं आहे. आजही भाविक मोठ्या संख्येने अमृत स्नानामध्ये सहभागी होण्यासाठी त्रिवेणी संगमावर जमले आहेत. देशा-परदेशातील भाविकांनी यामध्ये सहभागी होत शाही स्नानाचा आनंद घेतला आहे. वसंत पंचमी च्या दिवशी माता सरस्वतीचा जन्म झाला अशी धारणा आहे.

मौनी अमावस्येच्या दिवशी झालेल्या शाही स्नानामध्ये मोठ्या संख्येने भाविक त्रिवेणी संगमावर आल्याने 30 जणांचा चेंगराचेंगरीमध्ये मृत्यू झाला. आज शाही स्नानादरम्यान गर्दीचं व्यवस्थापन करण्यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी 8 वाजेपर्यंत 62.25 लाख भाविकांनी अमृत स्नान केले. 2 फेब्रुवारीपर्यंत 34.97 कोटीहून अधिक भाविकांनी पवित्र स्नान केले आहे. त्रिवेणी संगमावर अमृतस्नाना दरम्यान गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव करण्यात आला.

डीआयजी महाकुंभ, वैभव कृष्णा यांनी दिलेल्या माहितीनुसार, "व्यवस्था उत्तम ठेवण्याचा प्रयत्न आहे आणि आज आमची गर्दी नियंत्रणाची उपाययोजना योग्य ठिकाणी आहे. सर्व आखाड्यांचे स्नान यशस्वीरित्या संपन्न झाले आहे. महानिर्वाणी आखाडा, निरंजनी आखाडा आणि जुना आखाडा यांनी त्यांचे स्नान यशस्वीपणे पूर्ण झाले आहे. "