Dev Deepawali 2020 Wishes In Marathi: देव दिवाळी आणि देव दिपावली यात कधीच गल्लत करू नका. देव दिवाळी कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी साजरी केली जाते. आणि देव दिपावली हा खंडोबाच्या देवस्थानांमध्ये साजरा होणारा एक उत्सव आहे. मार्गशीर्ष महिन्याचा पहिलाचा दिवस म्हणजे देवदीपावली (Dev Deepawali) किंवा मोठी दिवाळी. या दिवशी खंडोबाच्या (मल्हारी मार्तंडाच्या) देवळात दीपोत्सव करतात. देवदीपावलीचा दिवस हा मुख्यत: चित्पावनांमध्ये कुलदैवत, ग्रामदैवत यांना भजण्याचा दिवस असतो. चित्पावनांमध्ये त्या दिवशी प्रामुख्याने वडे-घारग्यांचा किंवा आंबोळीचा नैवेद्य असतो. यंदा हा उत्सव मोठ्या संख्येने साजरा करता येणार नसल्याने आपण सोशल मिडियाच्या माध्यमातून एकमेकांना या सणाच्या शुभेच्छा देऊ शकतो.
मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्याच दिवशी साजरा केला जाणारा देवदीपावलीचा हा सण फार विशेष मानला जातो. या दिवशी लोकांमध्येही प्रचंड उत्साह असतो. या सणाच्या निमित्ताने खास मराठीतून शुभेच्छा संदेश (Margashirsha Guruvar Vrat 2020 Dates: मार्गशीर्ष गुरूवार महालक्ष्मी व्रताची यंदा 17 डिसेंबर पासून सुरूवात; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक!)
याच दिवशी मल्हारी नवरात्रही सुरू होते. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून शुद्ध षष्ठीपर्यंत चंपाषष्ठीचे सहा दिवसांचे नवरात्र असते. जेजुरीला हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात व भक्तिभावाने साजरा होतो. कुलाचाराप्रमाणे पूजेत सुघट व टाक असतात. नवरात्राप्रमाणेच रोज माळा वाढवत घाटावर लावायच्या असतात. सहा दिवस नंदादीप लावतात.