श्रावण वद्य अष्टमी दिवशी कृष्ण जन्म झाल्यानंतर दुसरा दिवस हा गोपाळकाल्याचा (Gopalkala) असतो. दहीहंडी म्हणून हा सण साजरा केला जातो. माखनचोर कृष्णाच्या लीला ज्यांनी ऐकल्या आहेत त्यांना ठाऊकच असेल बाल कृष्णाला दही, तूप, लोणी विशेष आवडत असे. त्यामुळे ठिकठिकाणी दही हंडी बांधून ती फोडण्यासाठी स्पर्धा रंगते. चित्तथरारक अशा या साहसी खेळाला आता ग्लॅमर मिळत आहे. पण सण म्हणून हा दिवस साजरा करणार्या तुमच्या मित्र मंडळींना, नातेवाईकांना, सोशल मीडीयात दहीहंडीच्या शुभेच्छा WhatsApp Status, Messages, Wishes, Greetings, GIFs द्वारा शेअर करत नक्की देऊ शकता. त्यासाठी लेटेस्टली कडून देण्यात आलेली ही शुभेच्छापत्र डाऊनलोड करून तुम्ही शेअर करू शकता.
दहीहंडी हा सण मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात मुंबई, ठाण्यात रंगतो. 9-10 थरांच्या मदतीने हंड्या फोडण्यासाठी स्पर्धा रंगत असते. आता दहीहंडीचा थरार केवळ सणापुरता मर्यादित न राहता त्याचा साहसी खेळामध्ये समावेश व्हावा म्हणून देखील प्रयत्न सुरू आहेत.
दहीहंडीच्या शुभेच्छा
गोपाळकाला व दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा!
WhatsApp Reads: एकच जल्लोष एकच लय
बोल बजरंग बली की जय!
दहीहंडी उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!
WhatsApp Reads: गोविंदा रे गोपाळा...
दहीहंडी उत्सवाच्या बाळगोपाळांना
हार्दिक शुभेच्छा!
WhatsApp Reads: माखनचोर चित्तचोर
गोकुळातील नंदकिशोर
दह्या दुधाची करतो चोरी
दहीहंडीला येतो जोर
दहीकाल्याच्या मन:पूर्वक शुभेच्छा!
WhatsApp Reads: फुलांचा हार
पावसाची सर
राधा-कृष्णाच्या प्रेमाला आली बहर
साजरा करुया गोपालकाल्याचा सण!
दहीहंडीच्या खूप खूप शुभेच्छा!
दहीहंडीचा सण दिवसभर 'ढाक्कुमाकुम'चा तालावर रंगतो. वर्षभर महिला-पुरूष यांची गोविंदा पथकं सराव करत असतात. संयमाची परीक्षा पाहणारा हा दहीहंडीचा सण या वर्षी दोन वर्षांनी पुन्हा निर्बंधमुक्त वातावरणामध्ये साजरा केला जाणार आहे. त्यामुळे आयोजक आणि गोविंदा पथक दोन्ही मोठ्या उत्साहात आहेत.