Christmas HD Images 2021: नाताळ किंवा ख्रिसमस हा ख्रिश्चन धर्मियांचा एक महत्वपूर्ण सण आहे. 25 डिसेंबर हा येशुंचा जन्मदिवस म्हणून साजरा करण्यात येतो. ख्रिश्चन लोकं या सणाला फार महत्व देतात. या सणाला ख्रिसमस ट्री आणि नाताळ बाबा या दोघांनाही विशेष आहे. ख्रिसमस म्हटलं की, ही ख्रिसमस ट्री सजवायची गिफ्ट्स लावायचे मग नाताळ बाबा येऊन लहान मुलांना छान-छान गिफ्ट्स देतो अशा गोष्टी या दिवशी केल्या जातात.(Christmas Recipes: Gingerbread Cookie ते Cake यंदा ख्रिस्मस निमित्त घरीच ट्राय करा हे खास पदार्थ)
या दिवशी लोक Secrete Santa बनून आपल्या प्रियजनांना गिफ्ट देतात. त्यामुळे लहानांपासून ते मोठ्यांपर्यंच्या चेहऱ्यावर हसू फुललेले दिसून येते. नाताळच्या दिवसी क्रिसमस ट्री सजवले जाते. केक सह एकमेकांना चॉकलेट्स देत तोंड गोड केले जाते. या दिवशी बहुतांश जण आपल्या घरी पार्टीचे सुद्धा आयोजन करतात. तर यंदाच्या ख्रिसमस निमित्त Wishes, Messages, WhatsApp Status, Facebook Post पाठवून साजरा करा नाताळचा सण. (Christmas 2021 Nail Art Ideas and Tutorials: नाताळ सणानिमित्त नखांवर सांताक्लॉज ते ख्रिसमस ट्री च्या सोप्प्या नेल आर्टचे पहा व्हिडिओ)
संपूर्ण जग 25 डिसेंबरला ख्रिसमस साजरा करते, मात्र सर्बिया, बेलारूस, मॉन्टेनेग्रो, कझाकस्तान, मॅसेडोनिया, इथिओपिया, ज्योर्जिया इत्यादी देशांमध्ये 7 जानेवारीला ख्रिसमस साजरा केला जातो.