
Chhatrapati Sambhaji Maharaj Rajyabhishek 2021 Images: छत्रपती संभाजी महाराज यांचा 16 जानेवारी 1681 मध्ये राज्याभिषेक सोहळा पार पडला होता. यंदा शंभूराजांचा 341 वा राज्याभिषेक साजरा होत आहे. शिवाजी महाराजांच्या निधनानंतर मराठा साम्राज्याची सर्व जबाबदारी त्यांचे चिरंजीव छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांच्यावर आली. त्यामुळे शंभूराजांनी खचलेल्या रयतेला आधार देत आपला राज्याभिषेक करून घेतला. यावेळी त्यांनी जनतेला शिवरायांच्या काळातील व्यवस्था पुढेही कायम राहील, याची ग्वाही दिली. शिवरायांप्रमाणेचं शंभूराजांनीदेखील मराठी सामाज्य यशस्वीरित्या सांभाळले. आज त्यांच्या राज्याभिषेकदिनी त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून WhatsApp Messages, Wishes, Greetings शेअर करून त्रिवार अभिवादन नक्की करा.






शंभुराजे लहानपणापासुनचं जिजाऊ आणि शिवरायांच्या मार्गदर्शनाखाली राजकारणाचे धडे घेत होते. शिवरायांच्या सुचनेनुसार शंभुराजेंनी पन्हाळ्यावरुन राज्यकारभार सुरु केला. संभाजी महाराजांचा जन्म 14 मे इ.स. 1657 रोजी किल्ले पुरंदर येथे झाला. राजपुत्र असल्यामुळे रणांगणावरील मोहिमा आणि राजकारणातील डावपेच यांचे बाळकडू त्यांना लहानपणापासूनचं मिळाले होते.