
Balasaheb Thackeray Birth Anniversary Images: शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena Founder Balasaheb Thackeray) यांची आज 95 वी जयंती साजरी होत आहे. आज बाळासाहेबांच्या पुतळ्याचे अनावर होणार आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या 95 व्या जयंती निमित्त होणाऱ्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, मनसे प्रमुख राज ठाकरे आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे एकाच व्यासपिठावर उपस्थित राहणार आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त WhatsApp Messages, Wishes, Greetings शेअर करुन शिवसैनिकांना द्या खास मराठी शुभेच्छा. (वाचा - Balasaheb Thackeray Birth Anniversary: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज ठाकरे पुन्हा एकदा एकाच व्यासपिठावर; शरद पवार, देवेंद्र फडणवीसही राहणार उपस्थित)





बाळ केशव ठाकरे ऊर्फ बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म 23 जानेवारी 1926 रोजी झाला. बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रातील शिवसेना पक्षाची स्थापना केली. ते उत्तम राजकारणी व व्यंगचित्रकार होते. तसेच बाळासाहेब हे सामना या मराठी दैनिकाचे हे संस्थापक होते. आजही मराठी माणसाच्या हृदयामध्ये बाळासाहेबांचे स्थान कायम आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त वरील मराठी मेसेस पाठवून शिवसैनिकांना मराठमोळ्या शुभेच्छा नक्की द्या.