Babasaheb Ambedkar Jayanti Rangoli Design 2024: डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त काढता येतील अशा हटके रांगोळी डिझाईन
Rangoli Designs For Ambedkar Jayanti 2024

Babasaheb Ambedkar Jayanti Rangoli Design: भारतीय राज्यघटनेचे जनक डॉ. भीमराव रामजी आंबेडकर म्हणजेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल रोजी झाला होता, म्हणून दरवर्षी 14 एप्रिल रोजी  त्यांची जयंती साजरी केली जाते.  डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजातील दलित व मागासवर्गीयांच्या उत्थानासाठी केलेल्या महत्त्वपूर्ण कार्याचे स्मरण करून त्यांना आदरांजली वाहण्यात येते. किंबहुना त्यांनी आपल्या हयातीतच सामाजिक भेदभाव, अस्पृश्यता आणि जातिवाद दूर करण्यासाठी लढा दिला. यासोबतच गरीब आणि दलित वर्गातील लोकांची स्थिती सुधारण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजातील गरीब, दलित आणि मागासलेल्या लोकांच्या उन्नतीसाठी समर्पित केले. दरम्यान, या खास प्रसंगी जग भारत ही जयंती साजरी केली जाते आणि जागो जागी कार्याक्रमचे आयोजन केले जाते. या विशेष प्रसंगी आम्ही जयंती निमित्त काढता येतील असे सुंदर रांगोळी डिझाईन घेऊन आलो आहोत, व्हिडीओ पाहून तुम्ही आंबेडकर जयंती निमित्त सुंदर रांगोळी काढू शकता.  

पाहा व्हिडीओ:

परदेशातून डॉक्टरेट पदवी मिळवल्यानंतर ते मायदेशी परतले आणि त्यांनी दलित समाजाच्या उन्नतीसाठी आवाज उठवला. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या आयुष्यात आलेल्या सर्व आव्हानांचा धैर्याने सामना केला आणि प्रत्येक टप्प्यावर संघर्ष करून यश संपादन केले. त्यांचे संपूर्ण जीवन प्रत्येकासाठी प्रेरणास्त्रोतापेक्षा कमी नाही. दरम्यान, आजचा दिवस तुम्ही वर दिलेले रांगोळी डिझाईन काढून आणखी खास बनवू शकता.