Ayurveda Day 2020 Date: भारतामध्ये आयुर्वेद दिवस कधी साजरा केला जातो? जाणून घ्या यंदाची थीम
Why is National Ayurveda Day celebrated on Dhanteras? (Photo Credits: Wikimedia Commons/ Ministry of AYUSH)

National Ayurveda Day 2020:  भारताने जगाला दिलेल्या संपन्न वसांच्या ठेवींमध्ये आयुर्वेद हा एक महत्त्वाचा ठेवा आहे. वेदांमधील एक महत्त्वाचा ग्रंथ म्हणजे आयुर्वेद. दरवर्षी धन्वंतरी जयंतीला आयुर्वेद दिवस साजरा केला जातो. यंदा पाचवा आयुर्वेद दिवस 13 नोव्हेंबर दिवशी साजरा केला जाणार आहे. या दिवसाच्या निमित्ताने आयुर्वेद आणि त्यामधील विविध उपचारपद्धतींबाबत जनजागृती करण्याचं काम केले जाते. यंदा कोरोना संकटाच्या सामन्यामध्ये आयुर्वेदाची मदत घेतली जात आहे. त्यामुळे यंदाच्या आयुर्वेद दिवस 2020 ची थीम देखील त्याच अनुषंगाने ठरवण्यात आली आहे. यंदाचा पाचवा आयुर्वेद दिन Ayurveda in the management of coronavirus disease (Covid-19) या अनुषंगाने साजरा केला जाणार आहे. Coronavirus संकट काळात भारतीयांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी Ministry of AYUSH ने सुचवले हे नैसर्गिक उपाय!

भारतामध्ये 2016 पासून केंद्रीय आयुष मंत्रालयाकडून दिवाळीतील धन्वंतरी जयंतीचा दिवस हा आयुर्वेद दिवस म्हणून साजरा करण्याला सुरूवात झाली आहे. दरवर्षी त्याचं सेलिब्रेशन एका विशिष्ट थीमवर केले जातं. दरम्यान धन्वंतरी ही आयुर्वेदाची देवता असल्याने तिचं पूजन करण्याची देखील प्रथा आहे.

भारतामधून अजूनही कोरोना व्हायरस हद्दपार झालेला नाही. त्याचा फैलाव आणि प्रादुर्भाव रोखण्यास काही प्रमाणात यश आलं आहे. मात्र संकट टळलेलं नसल्याने नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. कोरोनाला रोखण्यासाठी लस किंवा औषध उपलब्ध नाही त्यामुळे प्रतिबंधात्मक उपायांचा आधार घेतला आहे. अशामध्ये आयुर्वेदामधील काही उपचार पद्धती फयादेशीर ठरू शकते यादृष्टीकोनातूनही उपचार जाहीर करण्यात आले आहे. त्याची माहिती सरकार कडून देताना गुळवेल, काढा, हळद, च्यवनप्राश यांचं नियमित सेवन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

भारतामध्ये यंदा त्यादृष्टीने एक विशेष वेबिनार आयुर्वेद दिवसाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आले आहे. त्यादिवशी अंदाजे दीड लाख लोकं जगभरातून त्यामध्ये सहभागी होतील असादेखील कयास आहे.