अयोध्या श्रीराम जन्मभूमी मंदिर ट्रस्ट तर्फे आजपासून रामल्लाच्या ऑनलाईन दर्शनाला सुरुवात; फेसबुक, ट्विटर द्वारे घेता येणार लाईव्ह आरतीत सहभाग
Ayodhya Shri Ram Janmabhoomi Mandir (Photo Credits: Facebook)

अयोध्या श्रीराम मंदिराचा (Ayodhya Ram Mandir)  ऐतिहासिक खटला मार्गी लागून अयोध्येत राम मंदिर स्थापनेला हिरवा झेंडा दाखवण्यात आला, त्यानंतर चैत्र नवरात्री (Chaitra Navratri) च्या मुहूर्तावर 25 मार्च रोजी त्याठिकाणच्या तात्पुरत्या मंदिरात प्रभू श्रीरामांची मूर्ती देखील स्थापन करण्यात आली. या एकूण निर्णयांनंतर यंदा 2 एप्रिल रोजी श्रीराम जन्म सोहळा म्हणजेच राम नवमी (Ramnavami) उत्सव जोरदार रूपात पार पडणार होता. मात्र कोरोनाच्या संकटामुळे देशभरात १४ एप्रिल पर्यंत लॉक डाऊन जारी करण्यात आल्याने हा उत्सव सुद्धा रद्द करण्यात आला आहे. अशावेळी श्रीरामाचे दर्शन घेऊ इच्छिणाऱ्या लाखो भक्तांच्या इच्छेवर पाणी फिरले होते, मात्र आता आता श्रीराम जन्मभूमी मंदिर ट्रस्ट तर्फे (Shri Ram Janmabhumi Mansir Trust)  भक्तांसाठी एक खुशखबर समोर येत आहे. आजपासून अयोध्येतील या अस्थायी मंदिरातील रामल्लाच्या मूर्तीचे दर्शन भाविकांना ऑनलाईन घेता येणार आहे, फेसबुक, ट्विटर या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण घरबसल्या रोजचे फोटो पाहू शकणार आहेत तसेच लाईव्ह आरती मध्ये सुद्धा सहभागी होऊ शकणार आहात. अयोध्या राम मंदिर उभारणीसाठी शिवसेनेकडून 1 कोटी रुपयांचा निधी; उद्धव ठाकरे यांची मोठी घोषणा

प्राप्त माहितीनुसार, 25 मार्च रोजी अयोध्या राम जन्मभूमीवर अस्थायी रूपातील मंदिराची बांधणी करून यामध्ये प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली होती. या प्रसंगी उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील उपस्थित होते, मात्र कोरोनाच्या भीतीने यानंतर देशातील सर्व मंदिरे बंद करण्यात आली. यावेळी मंदिरात धार्मिक पूजा अर्चना जरी करता येत असल्या तरी दर्शनासाठी मात्र परवानगी देण्यात आलेली नाही. याच पार्श्वभूमीवर अयोध्या राम मंदिर ट्रस्ट कडून फेसबुक व सोशल मीडियावर रोज आरती लाईव्ह केली जाणार आहे तसेच प्रभू श्रीरामाचे फोटो सुद्धा शेअर केले जात आहेत.

अयोध्या श्रीराम जन्मभूमी मंदिर ट्रस्ट पोस्ट

दरम्यान, यंदाच्या रामनवमी उत्सवासाठी अयोध्येत लाखो भाविक जाण्याच्या तयारीत होते, मात्र त्यापूर्वीच हा लॉक डाऊन चा निर्णय घेण्यात आल्याने घरातून बाहेर पडणेही आता शक्य होणार नाहीये, अशावेळी सर्वांच्या श्रद्धेला लक्षात घेता मंदिर ट्रस्ट कडून हा निर्णय घेण्यात आला आहे.