Ashadhi Ekadashi 2020 Marathi Songs: आषाढी एकादशी निमित्त विठुरायाची 'ही' खास मराठी गाणी (Watch Video)
Shree Vitthal (Phot o Credits-YouTube)

Ashadhi Ekadashi 2020 Marathi Songs: महाएकादशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आषाढी एकादशीच्या सोहळा आज (1 जुलै) पार पडणार आहे. वारकरी संप्रदायापासून ते महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून आज विठुरायाचा नामाचा गजर ऐकायला मिळणार आहे. आषाढी एकादशीचा उत्साह प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसून येणार आहे. आजच्या दिवशी विठुराच्या दिंड्या निघतात. विठ्ठलाचे अभंग- भजने गायली जातात. प्रत्येकाच्या मुखातून फक्त विठुरायाचे कौतुक आणि रुपाचे वर्णन करण्यात येते. परंतु यंदा कोरोनाचे वारीवर सावट असल्याने ती रद्द करण्यात आली आहे.(Ashadhi Ekadashi 2020: पंढरपुरामध्ये तयारी अंतिम टप्प्यात; विठ्ठल रूक्मिणी मंदिर सजावट ते संचारबंदी नियम कोरोना संकटात असा असेल आषाढीचा सोहळा)

वारकरी संप्रदायाची मोठी परंपरा असलेल्या महाराष्ट्रात आषाढी एकदशीचे मोठे महत्त्व आहे. तर विठ्ठलाच्या भक्तीत दंग झालेले वारकरी टाळ, झांजांच्या तालावर तुकोबा, ज्ञानेश्वरांचे अभंग गात ही पालखी खांद्यावरून पंढरपूर पर्यंतचालत नेतात. गळ्यात तुळशीच्या माळा घालतात आणि कपाळी गंध लावतात. आषाढी एकादशी निमित्त पार पडणारा हा सोहळा पाहण्याजोगा असतो. प्रत्येकाला आपण विठुरायाला कधी भेटतो याची आतुरता लागलेली असते. तर यंदा तुम्हाला पंढरपुरची वारी करणे शक्य नाही तर नाराज होऊ नका. कारण आढाषी एकादशी निमित्त विठुरायाची 'ही' खास  गाणी ऐकून आजचा दिवस करा साजरा.(Ashadhi Ekadashi 2020 Messages: आषाढी एकादशी निमित्त मराठमोळे शुभेच्छापत्रं, Images, Wishes, Facebook व WhatsApp वर शेअर करुन साजरा करा हा मंगलमय सण!)

विठू माउली तू माउली जगाची

कानडा राजा पंढरीचा

अवघे गरजे पंढरपूर

सावळा तू श्रीहरी

Ashadhi Ekadashi 2020 Images: आषाढी एकादशी निमित्त Wishes,Whatsapp Status - Watch Video

 

माऊली माऊली

विठ्ठल विठ्ठल

पंढरपुराप्रमाणेच महाराष्ट्रातही इतर विठ्ठल रूक्मिणीची मंदिरे बंद ठेवली जाणार आहेत. अनेक ठिकाणी ऑनलाईन माध्यमातून पूजा दाखवली जाईल. विठूरायाच्या भक्तांना कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता घरच्या घरीच हा खास सोहळा साजरा करण्याचं आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान आषाढी एकादशी ही देवशयनी एकादशी म्हणून देखील ओळखली जाते. भगवान विष्णू आजपासून 4 महिने निद्रावस्थेमध्ये राहतात. तर देवउठनी एकादशीला जागे होतात.