
Angarki Sankashti Chaturthi Marathi Wishes: प्रत्येक महिन्यात संकष्टी चतुर्थी येते तर अंगारकी चतुर्थी वर्षातून दोनदा येते. उद्या, मंगळवार, 27 जुलै रोजी वर्षातील दुसरी अंगारकी चतुर्थी आहे. अंगारकी चतुर्थी निमित्त गणेशभक्तांमध्ये मोठा उत्साह असतो. अंगारकी चतुर्थी दिवशी गणेशाची भक्तीभावाने पूजा केली जाते. अनेक गणेशभक्त या निमित्ताने उपवास करतात. हा भक्तीमय दिवस अधिक मंगलमय करण्यासाठी तुमच्यासाठी खास Wishes, Messages, Images, Greetings घेऊन आलो आहोत. ही शुभेच्छापत्रं सोशल मीडियाच्या फेसबुक (Facebook), व्हॉट्सअॅप (WhatsApp), ट्विटर (Twitter), इंस्टाग्राम (Instagram) द्वारे शेअर करुन तुम्ही गणेशभक्तांना शुभेच्छा देऊ शकता. Angarki Sankashti Chaturthi July 2021: यंदाच्या वर्षातील दुसरी अंगारकी संकष्टी आज; चतुर्थीचं व्रत करणार्यांनी जाणून घ्या चंद्रोदयाच्या वेळा!
चतुर्थी आणि मंगळवार हा योग्य जुळून आला की अंगारकी चतुर्थी असते. या दिवशी गणेश मंदिरांमध्ये मोठी गर्दी होते. परंतु, यंदा कोविड-19 संकटामुळे मंदिरं बंद आहेत. त्यामुळे घरच्या घरी पूजा करुन अंगारकी चतुर्थी साजरी करावी लागणार आहे. (Mumbai Siddhivinayak Ganpati Online Darshan: अंगारकी चतुर्थी निमित्त घरबसल्या घ्या सिद्धिविनायकाचे दर्शन, Watch Video)
अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा!
अंगारकी निमित्त पूर्ण होवो तुमच्या मनोकामना
सुख, समृद्धी, ऐश्वर्य तुम्हास लाभो
हिच बाप्पा चरणी प्रार्थना
अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या सर्वांना शुभेच्छा!

माता पित्याचे आत्मरूप तू
ओंकाराचे पूर्ण रूप तू
कार्यारंभी तुझी अर्चना
विनायका स्वीकार वंदना
अंगारकी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

तू सुखकर्ता तू दुःखहर्ता
विघ्न विनाशक मोरया
संकटी रक्षी शरण तुला मी
गणपती बाप्पा मोरया
अंगारकी संकष्टी चतुर्थी च्या शुभेच्छा!

ॐ एकदंताय विद्महे
वक्रतुंडाय धीमहि।
तन्नो दन्ती प्रचोदयात्
अंगारकी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

श्री गणेशाच्या कृपेने,
प्रत्येक टप्प्यावर प्रत्येक कार्यात आपल्याला यश लाभो ही सदिच्छा
अंगारकी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

अंगारकी चतुर्थी निमित्त चंद्रोदयावेळी गणरायाची पूजा केली जाते. उद्या असणाऱ्या संकष्टी चतुर्थी दिवशी चंद्रोदय 9.59 मिनिटांनी होणार आहे. त्यावेळेस गणपती बाप्पाची पूजा, आरती करुन नैवेदय दाखवा आणि उपवास असणारे त्यानंतर उपवास सोडू शकतात.