अंगारकी संकष्टी चतुर्थी हा दिवस गणेशभक्त दिवसभर बाप्पाची पूजा करून, दिवसभराचा उपवास करून करतात. आणि हा उपवास संकष्टीच्या दिवशी चंद्रोदयाच्या वेळेस सोडण्याची प्रथा आहे. मग तुम्ही देखील अंगारकीचा उपवास रात्री चंद्रोदयाच्या वेळेस सोडणार असाल तर जाणून घ्या तुमच्या शहरातील आजच्या चंद्रोदयाच्या वेळा.
जुलै 2021 अंगारकी संकष्टी चंद्रोदय वेळ
मुंबई - रात्री 9 वाजून 59 मिनिटं
पुणे - रात्री 9 वाजून 55 मिनिटं
रत्नागिरी - रात्री 9 वाजून 56 मिनिटं
नाशिक - रात्री 9 वाजून 56 मिनिटं
नागपूर - रात्री 9 वाजून 35 मिनिटं
औरंगाबाद -रात्री 9वाजून 50 मिनिटं
बेळगाव- रात्री 9 वाजून 51 मिनिटं
गोवा- रात्री 9 वाजून 53 मिनिटं
दरम्यान या वर्षी 3 अंगारक संकष्टीचा योग आला आहे. पहिली 3 मार्च त्यानंतर आज 27 जुलै दिवशी दुसरी आणि आता तिसरी अंगारकी संकष्टी 23 नोव्हेंबरला असणार आहे. अंगारकी संकष्टी चतुर्थी दिवशी गणपतीची आराधना आणि व्रत केल्यास वर्षभरातील संकष्टीचं पुण्य मिळतं असा समज आहे. गणपतीची आराधना करून संकट दूर ठेवण्यासाठी प्रार्थना केली जाते. गणपती बाप्पा हा विघ्नहर्ता असल्याचा हिंदू धर्मियांचा समज असल्याने त्याच्या पूजेला विशेष मान आहे.