
मुस्लिम धर्मियांच्या अत्यंत पवित्र महिन्यांपैकी एक रमजान. सध्या या महिन्यातील रोझे सुरू आहेत. आणि रमजान ईद पूर्वी आजचा एक दिवस या रोजे ठेवणार्या व्यक्तींसाठी खास आहे. आज रमजान महिन्यातील शेवटचा शुक्रवार आर्थात जुमा आहे. हा दिवस अलविदा जुमा म्हणून देखील ओळखला जातो. मुस्लिम बांधवांची अशी धारणा आहे की रमजान शरीफ च्या तिसर्या आणि शेवटच्या अशर्यामध्ये रोजा ठेवणारी व्यक्ती जर प्रार्थना करते तर तिला जहन्नूमच्या आगीपासून संरक्षण मिळतं. त्यामुळे मुस्लिम बांधवांसाठी हा आजचा अलविदा जुम्मा खास आहे. आजचा सारा दिवस मुस्लिम बांधव अल्लाहची प्रार्थनाकरून घालवतात. सध्या भारतामध्ये कोरोनाचा प्रकोप सुरू असल्याने धार्मिक स्थळं बंद आहेत आणि आरोग्याच्या दृष्टीने देखील घरात राहूनच नमाज पठण सुरू आहे.
रमाजानचा अलविदा जुम्मा आला म्हणजे अअता ईद अवघ्या काही दिवसांवर आहे. ईदचा चंद्र पाहण्यापूर्वीचा हा शेवटचा जुम्मा असल्याने तुमच्या नातेवाईकांना, मित्रमंडळींना या दिवसाच्या शुभेच्छा खास व्हॉट्सअॅप स्टिकर्स, HD Images, Wishes, Greetings पाठवून द्यायला विसरू नका.
अलविदा जुम्मा !





जुमा-तुल-विदा म्हणजेच आजचा अलविदा जुम्मा दिवशी केली जाणार नमाज ही ईस्लाम धर्मावर विश्वास ठेवणार्यांसाठी खास असते. आजच्या दिवशी अगदी मनापासून केलेली प्रार्थना अल्ला कबुल करतो आणि सार्या गुन्हांमधून, चूका, पापांमधूनही माफी मिळते.